anandnagri logo
मुख्य बातम्या:

मराठवाड्यातील 23 कारखान्याच्या चिमन्या पेटल्या

By आनंदनगरी वेब टीम | Sat 14-01-2017 | 01:06:34 pm


♦22 लाख 79 हजार मे. टन ऊसाचे गाळप, 20 लाख 94 हजार क्विंटल साखरेचे उत्पन्न  
                            बजरंग शुक्ला 
नांदेड- गेल्या 3 वर्षापासूनचा दुष्काळ यावर्षी मराठवाड्याच्या मुळावर बेतला मराठवाड्यातील 70 कारखान्यापैकी केवळ 23 कारखान्याच्या चिमन्या सन 2016-17 च्या गळीप हंगामात पेटल्या यातून 22 लाख 79 हजार 696 मे.टन ऊसाचे गाळप झाले. यापासून 20 लाख 94 हजार 41 क्विंटल साखरेचे उत्पन्न झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाहता हे उत्पन्न 50 टक्क्याच्या खाली घटल्याचा अंदाज व्यक्त केला गेला. 
मराठवाड्यात साखर कारखाने सर्वात जास्त उस्मानाबाद जिल्ह्यात असून एकूण 16 कारखाने आहेत. त्यापैकी केवळ 2 कारखान्यांच्या चिमन्या पेटल्या तर सर्वात कमी हिंगोली जिल्ह्यात 4 कारखाने असून या पैकी 3 कारखान्यांच्या चिमन्या पेटल्या. गेल्या 3 वर्षापासून मराठवाड्यात तिव्र दुष्काळ पडला होता. यावर्षी निसर्गाने मराठवाड्यावर कृपया केली असून परतीच्या पावसात सर्वच बंदारे, धरणे, प्रकल्प 100 टक्के भरली. पण ही धरणे शेतकऱ्यांना दिलासा देणारे असले तरी ऊसाचा पेरा वाढले की, नाही हे मात्र सांगता येत नाही. गेल्या वर्षी मराठवाड्यातील कारखान्याची स्थिती चांगली होती. मात्र यावर्षी मात्र नांदेड आणि औरंगाबाद विभागातील मराठवाड्यातील 3 जिल्हे या दोन विभागा अंतर्गत येणाऱ्या  70कारखान्यापैकी केवळ 23 कारखाने या वर्षीच्या गाळीप हंगामात सुरू करण्यात आले. एकंदरीत मराठवाड्यातील साखरेचे उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 टक्याने घटले असून येणाऱ्या काळात साखर निश्चितच कडू झाल्याशिवाय राहणार नाही. असे चित्र आज तरी दिसून येते. 
मागील तीन वर्षापासूनच्या दुष्काळाने शेतकरी चांगलाच होरपळून निघाला. यात मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना ही जिल्हे मात्र तिव्र दुष्काळाच्या छायेत सापडले. राज्यातच नसून देशात न उदभवणारे संकट लातूर जिल्ह्याच्या नशिबाला आले. पिण्याचे पाणी रेल्वेने आणावे लागले. यामुळे मराठवाडा हा तिव्र दुष्काळाच्या छायेत सापडला होता. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या नंतर मराठवाड्यात कारखान्यांची संख्या सर्वात जात आहे. ऊस हा पाण्यावर आधारीत पिक असल्यामुळे याला अधिक पाणी लागते. पुढील सन 2017 व 2018 या वर्षात 23 कारखान्याच्याही चिमन्या पेटतील की नाही याची भिती कारखानदारांना आजच भेडसावत आहे. कारण शेतकऱ्यांना ऊस लावण्यासाठी उच्च दर्जाचे बेने नसल्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाचे बेने आणण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र गाठावा लागणार अशी सध्यातरी परिस्थिती आहे. 
►70 कारखान्यांपैकी 23 कारखांन्याच्या चिमन्या बहुतांश नोव्हेंबर महिन्यात पेटल्या आणि डिसेंबर महिन्यात बंदही झाल्या.यात 14 कारखान्यांच्या चिमन्या बंद झाल्याअसून केवळ 9 कारखान्यांच्या चिमन्या सध्या कांही दिवसतरी चालू राहतील. शेतकऱ्यांकडे ऊस नसल्याने कारखानेही जास्त दिवस चालू शकले नाहीत. 
►जिल्हे    एकूण     चालू   बंद    सध्यास्थिती 
जालना     5          5     -           4
औ.बाद    9             3     6    
बीड      10             4    6          1
परभणी      6          3    3          -
हिंगोली      4           3    1         -
नांदेड      8               2    6        1
उस्मानाबाद   16        2    14       2
लातूर      12            2    10        2

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920