anandnagri logo
मुख्य बातम्या:

पोलीस कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक  समस्यांसाठी समन्वय समितीची स्थापना 

By आनंदनगरी वेब टीम | Sat 14-01-2017 | 12:41:21 pm

फोटो


नांदेड (प्रतिनिधी)- पोलिस कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता एका समन्वय समितीचे गठन केले आहे,त्यात अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत,या समितीत एकूण 21 सदस्य आहेत.
पोलिसांच्या कुटुंबियांना अनेक तक्रारी असतात.वरिष्ठ पोलीस अधिकारी हे आपल्या विभागाच्या कामकाजांचा मूळ केंद्र बिंदू पोलीस शिपाई असतो,असे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी सांगतात.पण प्रत्यक्षात पोल्सी शिपाई हा वेठबिगाराची भूमिका बजावत असतो.पोलीस कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय अनेकदा आपली निवेदने पाठवतात.वरिष्ठ पोलीस अधिकारी हे ते समस्याग्रस्त पोलीस कर्मचारी आमच्या पर्यंत आलेच नाहीत असे सांगतात.एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाणे म्हणजे स्वर्ग गाठण्यासारखे आहे.ते त्यांना कधी कळेल.वरिष्ठ ते कनिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यास आपला गुलाम समजतो ही ब्रिटिश परंपरा भारताच्या स्वातंत्र्याला 65 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला तरी कोणीच समजून घेत नाही.एका महिला नेत्याने ब्रिटिश गेले तरी पण सद्या असलेले आयएएस आणि आयपीएस अधिकारी इंग्रजांचे बाप आहेत असे वक्तव्य केले होते.असो. 
महाराष्ट्र शासनाने 10 जानेवारी 2017 रोजी जारी केलेल्या आदेशान्वये राज्यातील पोलिसांच्या कुटुंबियांच्या विविध समस्यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी एक समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अध्यक्ष आहेत.इतर सदस्य असे आहेत.ज्यात मंत्री, पत्रकार, पोलीस कुटुंबीय, वकील, डॉक्टर,महिला अश्या सर्वच लोकांना जागा देण्यात आली आहे. 
 ते समन्वय समिती सदस्य असे आहेत, राज्यमंत्री गृह ग्रामीण,राज्यमंत्री गृह शहरे, मंगलप्रभात लोढा,ऍड.अनिल परब,सुनील शिंदे, प्रा.राम कदम, डॉ.परिणय फुके,अपर मुख्य सचिव गृह, पोलीस महासंचालक महाराष्ट्र,पोलीस आयुक्त बृहन्मुंबई, उपाध्यक्ष नि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य पोलीस गृह निर्माण वकल्याण महामंडळ मर्यादित, यशश्री प्रमोद पाटील,अनिता राजाराम बागवे, वंदना सुरेश राऊत,निर्मला बाबासाहेब भालेराव, राहुल अर्जुनराव डुबाले, जयश्री खाडिलकर, चंद्रकांत माळी,सुनील राणे, दीपक पाटील.  
या समिती गठणाचे आदेश स्वप्नील गोपाल बोरसे या राज्याच्या कार्यसन अधिकाऱ्याने महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने आणि नावाने जारी करून त्यावर स्वाक्षरी केली आहे.या समिती गठणावर एक पोलीस कर्मचारी आपली प्रतिक्रिया व्यक करतांना फक्त मिस्कील असे हसला.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920