anandnagri logo
मुख्य बातम्या:

अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्या; युवकास 3 वर्ष सक्तमजुरी 

By आनंदनगरी वेब टीम | Wed 11-01-2017 | 12:15:02 pm

नांदेड, (प्रतिनिधी) - एका अल्पवयीन बालिकेसोबत तिचा विनयभंग करुन शरीर सुखाची मागणी करणाऱ्या एका 21 वर्षीय युवकाला बिलोलीचे जिल्हा न्यायाधीश आनंद पाटील यांनी तीन वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
नायगाव तालुक्यातील एका गावातील आपल्या शेताच्या गोठ्यात एक अल्पवयीन बालिका दि.23 जुलै 2014 रोजी दुपारी साफसफाई करीत असताना त्याच गावातील राहणारा भागवत गणपती कांबळे (21) हा युवक तेथे आला. त्याने त्या बालिकेसोबत बळजबरी करत तिचा विनयभंग केला आणि तिच्याकडून शरीर सुखाची मागणी केली. बालिकेच्या वडिलाने दिलेल्या तक्रारीवरुन नायगाव पोलिसांनी गुन्हा क्र.37/2014 भारतीय दंड विधानाचे कलम 354 आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 8 प्रमाणे दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक राहुल वाघ यांनी भागवत कांबळेला अटक केली आणि तपासाअंती त्याच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात या प्रकरणी आठ साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुराव्याआधारे न्यायाधीश आनंद पाटील यांनी भागवत कांबळेला अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी भादंविच्या कलम 354 आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी मानले. दोन्ही कलमांसाठी भागवत कांबळेला तीन वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये रोख दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम भरली नाही तर तीन महिन्याची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागेल, असे निकालात नमुद करण्यात आले आहे. दंडाची रक्कम भरली तर ते पाच हजार रुपये त्या बालिकेला देण्यात यावे, असेही न्यायाधीश आनंद पाटील यांनी आपल्या निकालात लिहिले आहे. नायगाव पोलीस ठाण्याचे हवालदार परकेवार यांनी पैरवी अधिकाऱ्याची भूमिका वठवली. सरकारी वकील ऍड.डी.व्ही. कुलकर्णी यांनी शासनाची बाजू सादर केली.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920