anandnagri logo
मुख्य बातम्या:

सामूहिक विवाह सोहळ्यासाठी प्रयत्न करावेत

By आनंदनगरी वेब टीम | Mon 09-01-2017 | 06:36:55 pm

फोटो

अहमदपूर/प्रतिनिधी : आज शहरात माळी समाजाचा वधूवर परिचय मेळावा होत आहे ही बाब अभिनंदनीय आहे. भविष्यात  पूढे आता समाजाने सामूहिक विवाह सोहळ्यासाठी पूढे यावे असे अवाहन नगरसेवक डॉ.सिध्दार्थकूमार सूर्यवंशी यांनी केले. 
सावता माळी मंगल कार्यालय येथे राज्यस्तरीय  माळी समाज वधू- वर परिचय मेळाव्यात ते प्रमूख पाहूणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी हभप रवीकांत महाराज वसेकर हे होते तर विशेष उपस्थिती म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांची नातसून सौ.निताताई होले यांची उपस्थिती होत्या  प्रमूख पाहूणे म्हणून  ह. भ.प. प्रभूगूरू धर्माधिकारी होते. नगरीच्या नगराध्यक्षा सौ. अश्वीनीताई कासनाळे, भाजपा नेते माजी सभापती दिलीपराव देशमुख, प्रदेश प्रवक्ते  गणेश हाके, पं. स.चे माजी सभापती अशोकराव केंद्रे, सभापती ऍड. भारत चामे, बॅंकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे, सिराजभाई जागीरदार, अविनाश पाटील बोळेगांवकर, ओम   पूणे, आदींसह अनेकांची उपस्थिती होती. 
पूढे बोलताना  ते म्हणाले की, फुले दांम्पत्ये हे खऱ्या अर्थाने भारतरत्न पुरस्काराचे हक्कदार आहेत. भविष्याचा वेध घेण्यासाठी समाजाने खऱ्या अर्थाने संघटित व्हावे लागणार आहे. परंतू आपापसात लढत असल्याने सत्तेपासून आपण दूर जात आहोत. या पूर्वी राज्यात माधव ही जात फॅक्टर सत्ता मिळविण्यासाठी कारणीभूत ठरला होता. इतिहासातील या गोष्टी लक्षात ठेवून भविष्यामध्ये सूध्दा माळी समाजाने पूरोगामी चळवळ वृध्दींगत करण्यासाठी पून्हा एकदा पूढाकार घेण्याची गरज आहे. असे सांगून सुर्यवंशी यांनी सामाजिक चळवळीसाठी युवकांनी सक्रिय होण्याचे आवाहन केले. यास उपस्थित तरूणांनी दाद दिली.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वागताध्यक्ष रघुनाथ गोरे, तालूकाध्यक्ष छगन माळी, रंगनाथ आरसुडे, नरहरी माळी, आत्माराम डाके, बाबूराव आरसुडे, रघुनाथ डाके, संतोष गोरे, दत्तात्रय माळी आदींनी पूढाकार घेतला.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920