आगामी निवडणुकात भाजपला हात दाखवू-संजय बनसोडे
By आनंदनगरी वेब टीम | Mon 09-01-2017 | 06:36:50 pm
फोटो
जळकोट/प्रतिनिधी : नोटाबंदीमुळे शेतकरी, उद्योग धंद्ये, छोटे मोठे व्यावसायिक यासह शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. दर कोसळल्याने शेतातील टोमॅटो, कांदा सडला जात आहे, शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव नाही. भाजपच्या सरकार ने शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत घातले आहे त्यामुळे येत्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप सरकारला हात दाखवा असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संजय बनसोडे यांनी केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने विविध मागण्यासाठी सोमवार 9 रोजी तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन मागण्याचे निवेदन तहसिलदार शिवनंदा लंगडापुरे यांना देण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बनसोडे बोलत होते.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात भाजप सरकारने भारत देशात नोटबंदी केली आणि सर्व सामान्य जनतेला अडचणीत आणण्याचे महापाप केले. नोटाबंदी मुळे छोटे उद्योग धंदे बंद पडले आहे. अशा शासन धोरण निषेधार्थ पक्षाच्या आदेशानुसार जिल्हाभरासह जळकोट येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाअध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस संजय बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष बबन भोसले, जि. प. सदस्य रामराव राठोड, चंदन पाटील यांनी केले. धरणे आंदोलनात तालुकाध्यक्ष अर्जुन आगलावे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीचे जळकोट तालुकाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, अशोक डांगे, श्रावण गायकवाड, शाम डांगे, धनंजय भ्रमण्णा, मुमताज बागवान, गोविंद भ्रमण्णा, सत्यवान दळवे पाटील, आदीसह तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थीत होते.
व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California