anandnagri logo
मुख्य बातम्या:

पर्यवेक्षकास मारहाण केल्या प्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल

By आनंदनगरी वेब टीम | Mon 09-01-2017 | 12:13:12 pm

औसा (प्रतिनिधी)-औसा (जि. लातूर) शहरातील अजिम हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी नवोदय परीक्षेच्या पेपर मध्ये खाडाखोड झाले म्हणत  पर्यवेक्षक शिक्षकास या हायस्कूलच्या मुख्याध्यापक व सुपरवायझर ने बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी घडली दरम्यान शिक्षकाने दिलेल्या फिर्यादीवरून औसा पोलीसात मुख्याध्यापक व अन्य एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
           दि.8 जानेवारी रोजी नवोदय विद्यालयाच्या परिक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक दिलीप रोळे (वय 41)हे परिक्षा संपल्यानंतर दुपारी अडीच वाजता पेपर जमा करण्यासाठी मुख्याध्यापक कक्षेत गेले असता सदरील पेपर खाडाखोड झाल्याचे पाहून सुपरवायझर अहमद पटेल यांनी दिलीप रोळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली दरम्यान रोळे यांनी शिवीगाळ करु नका अशी विनंती केल्यानंतर अजिम हायस्कूल औसा येथील मुख्याध्यापक निजामोद्दीन शेख यांनी रोळे यांना शिवीगाळ करित वर्गातील बाकड्याच्या लाकडांनी जबर मारहाण केली यानंतर संबधित सुपरवायझर व मुख्याध्यापकांनी मिळून शिक्षक रोळे यांना केलेल्या मारहाणीत त्यांच्या डोक्यात जबर मार लागला असून याप्रकरणी शिक्षक दिलीप रोळे यांनी  दिलेल्या फिर्यादीवरून मुख्याध्यापक निजामोद्दीन शेख व अहमदखॉ पटेल यांच्या विरोधात औसा पोलीसात भादवि कलम 334 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास जाधव करित आहेत

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920