anandnagri logo
मुख्य बातम्या:

ऊस शेती दुष्काळी झळातून बाहेर

By आनंदनगरी वेब टीम | Thu 05-01-2017 | 01:15:19 pm

फोटो


♦  विभागात वाढणार साखरेचा गोडवा ♦15 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन♦ साखर उताऱ्यात जालना दुसऱ्या क्रमांकावर
                          संघपाल वाहुळकर
औरंगाबाद - सतत चार वर्षाच्या दुष्काळी झळातून यंदा उस शेती बाहेर पडल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या विभागात  एकूण 17 लाख 79 हजार 26 मेट्रीक ऊस गाळपातून तब्बल 15 लाख 18 हजार 970 क्विंटल साखरेचे उत्पादन मिळाले. साखरेचा उतारा एकूण 6.54 टक्के इतका आला आहे. 
दरम्यान, उस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडीसाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा, असे आवाहन विभागीय कृधि अधिक्षक कार्यालयाकडून करण्यात आले होत्या. गत चार वर्षापासून मराठवाडा दुष्काळात पोळत आहे. यंदा मात्र, पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मराठवाडा जलमय झाला. जलयुक्त शिवाराच्यामाध्यमातून जागोजागी पाणी मुरल्या गेले. या जमीनीत मुरलेल्या पाण्याचा उपयोग उसशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना झाला. औरंगाबाद साखर सहसंचालक कार्यालयातंर्गत मरावाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड व उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांतील एकूण 18 पैकी 17 सारख कारखाण्यांचे गाळप या हंगामात झाले. या आठवड्याच्या अहवालावरुन या कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यातील कारखान्याणूत या दि.3 जानेवारी रोजी 27 हजार 237 मेट्रीक टन उसाचे गाळप करण्यात आले. तर या आठवड्यात एकूण 17 लाख 79 हजार 26 मेट्रीक टन उसाचे गाळप करण्यात आले. त्यापोटी 15 लाख 18 हजार 970 क्विंटल साखर मिळाली. ज्याचा एकूण उतारा हा 6.54 टक्के इतका आहे.  यात सर्वाधिक उतारा हा नंदूरबार जिल्ह्याचा असून त्या पाठोपाठ जालना जिल्हा आघाडीवर आहे. त्यांचा उतारा अनुक्रमे 8.75 व 8.73 इतका आहे. तर त्या पाठोपाठ  औरंगाबाद 8.43, बीड 8.27 आणि जळगाव 8.19 टक्के इतका उतारा आला आहे.  
►दुष्काळाने घटले उसाचे क्षेत्र 
औरंगाबादमधील साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये यंदा ऊस गाळपासाठीचे क्षेत्र जवळपास अर्ध्यावर आले आहे. गतवर्षी 1 लाख 2 हजार हेक्टरवर असलेले उसाचे क्षेत्र यंदा केवळ 67 हजार हेक्टर असल्याचे दिसून येेते. 
►यंदा 17 कारखान्याचे गाळप
साखर सहसंचालकांच्या औरंगाबाद विभागातंर्गत असलेल्या जिल्ह्यांमध्ये गतवर्षी 21 साखर कारखान्यांनी गळीत हंगामासाठी पुढाकार घेतला होता. यंदा ही संख्या आजवर 18 पर्यंत पोचली आहे. सततच्या दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटल्याने यंदा गाळपासाठी कारखाने धजावत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या औरंगाबाद विभागात 9 सहकारी व 8 खाजगी साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920