anandnagri logo
मुख्य बातम्या:

मानवतच्या कॅनरा बॅंकेत  2 कोटी 70 लाखांचा घोटाळा

By आनंदनगरी वेब टीम | Thu 05-01-2017 | 01:14:23 pm


मानवत (प्रतिनिधी) - दलालांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे सादर करून 27 शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलण्यात आले असल्याचा प्रकार मानवतच्या कॅनेरा बॅंक शाखेत घडला आहे. या द्वारे झालेला घोटाळा तब्बल 2 कोटी 70 लाख रूपयांचा असल्याची माहिती नायब तहसीलदार मधुकर मिसाळ यांनी दिली आहे. नायब तहसीलदार मधुकर मिसाळ यांच्याशी प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, एकीकडे शेतकऱ्यांना कर्ज काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. परंतू दुसरीकडे बॅंकेच्या कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील 27 शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कागदत्राव्दारे प्रस्ताव दाखल करून कर्ज प्रकरणे मंजुर करून घेतले असल्याचे उघड झाले आहे. हा महाघोटाळा तब्बल 2 कोटी 70 लाखांचा आहेे.  शेतकऱ्यांच्या नावासह सातबारा, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बॅंकेचे बेबाकी प्रमाणपत्र, स्टॅम्प व हस्ताक्षर सर्वच कागदपत्रे बोगस तयार करण्यात आली आहे. यामध्ये दलालासह बॅंक कर्मचाऱ्यांनी मोठी साखळी कार्यरत असल्याने सदरील घोटाळा घडला आहे. याप्रकरणी फसवणुक करणाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920