anandnagri logo
मुख्य बातम्या:

मोदी देशाला संपवतील

By आनंदनगरी वेब टीम | Tue 03-01-2017 | 12:29:04 pm


♦ कॉंग्रेस निरिक्षक बसवराज यांची टिका
                        आनंद माने
लातूर- जगात अव्दितीय अशी लोकशाही असताना सभागृह किंवा मंत्रिमंडळातील कोणत्याही सहकाऱ्यांना विश्वासात न घेता नोटबंदीसारखा कठोर निर्णय घेणारे नरेंद्र मोदी भाजपाबरोबरच देशालाही संपुष्टात आणतील अशी टिका करत मोदी हे आधुनिक भस्मासुर आहेत असल्याचे प्रतिपादन ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीचे निरीक्षक बसवराज ए.पी. यांनी लातूर येथे केले. 
नोटबंदीच्या निर्णयाविरोधात अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्यावतीने देशभरात जनआंदोलन उभारले जात आहे. या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी तसेच कॉंग्रेस कार्यकर्त्यांना आगामी काळात होवू घातलेल्या निवडणुकाची रणनिती ठरविण्यासाठी बसवराज ए.पी. लातूर येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, देशावर बहूतांश काळ कॉंगे्रस पक्षाने प्रतिनिधीत्व केले आहे. असा दुर्देवी निर्णय अद्यापपर्यंत कोणालाही घ्यावासा वाटला नाही. अचानकपणे आणि मंत्रिमंडळासह सभागृहातील अन्य नेत्यांना विश्वासात न घेता हा निर्णय देशाच्या आज पर्यंतच्या इतिहासातील काळा निर्णय आहे. सत्ता भूषविणाऱ्या सर्वच सरकारापैकी मोदी सरकार सर्वात अपयशी सरकार ठरले असून युपीए सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयाचाच रिमेक आज मोदी सरकारकडून नाव बदलून केला जात आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर आज किती काळा पैसा जमा झाला आणि हा पैसा कोणाचा आहे ही यादी सरकारने जाहीर करावी. याबरोबरच 50 दिवस थांबा चित्र बदलेल असे म्हणणारे मोदी आज शांत आहेत असे सांगून 31 डिसंेंबर रोजी सरकारकडून देशवाशीयांना दिलासा मिळेल असे वाटत असताना मोदी यांच्याकडून सर्व सामान्यांची घोर निराशा झाली असल्याचीही टिका यावेळी बसवराज ए.पी.यांनी यावेळी केली. 8 नोव्हेंबर रोजी नोटबंदीचा निर्णय झाल्यानंतर या कालावधीत भाजपच्या 37 बड्या नेत्यांकडे 649 कोटी नवीन चलन सापडले. यावर सरकारकडून काय कारवाई करण्यात आली. असा सवालही याप्रसंगी बसवराज यांनी उपस्थित केला.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920