anandnagri logo
मुख्य बातम्या:

महिला शिक्षकांनी आदर्श पिढी घडवावी

By आनंदनगरी वेब टीम | Mon 02-01-2017 | 05:53:35 pm

फोटो


लातूर/प्रतिनिधी : शिक्षणाशिवाय समाजाची व देशाची प्रगती साधता येत नसते. या बाबीची आठवण आपण प्राधान्याने ठेवून अध्यक्ष पदाचा पदभार हाती घेताच शिक्षणाला गती, चालना देण्यासाठी महत्वपुर्ण निर्णय घेतले या शिक्षण प्रक्रियेत काम करणाऱ्या आमच्या महिला शिक्षकांनी आदर्श, नितीमान गुणवान पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करून स्त्री शक्तीचा महिमा सत्कारणी लावाला असे आवाहन जि.प.अध्यक्षा सौ. प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी उदगीर येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मार्फत आयोजित पाचव्या अधिवेशनच्या शुभारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन बोलताना केल्या. 
यावेळी आ. सुधाकर भालेराव, शिक्षक आ. विक्रम काळे, शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष काळु लोटसे पाटील, सरचिटणीस उदय शिंदे, सत्कार मुर्ती शिक्षक नेते शिवाजीराव साखरे, जिल्हाध्यक्ष किशनराव बिरादार, सरचिटणीस सुनिल हाके आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना सौ. कव्हेकर म्हणाल्या की, जि.प.मार्फत आपण शिक्षकांची सर्व प्रलंबित प्रश्ने सोडविलेले आहेत. तसेच जिल्ह्यातील जि.प.शाळेची गुणवत्ता वाढावी या गतिमान शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी असावा म्हणुन स्मार्ट स्कुलची मोहिम हाती घेतली. त्याचबरोबर खाजगी शाळेच्या स्पर्धेत टिकाव धरून विद्यार्थी संख्या वाढावी आदीसाठी आपण प्राधाण्याने प्रयत्न केले. त्यासाठी शिक्षकांनी त्यात सहभाग नोंदवून स्मार्ट स्कुल शाळा घडविण्यासाठी घेतलेले असून भविष्यातही आपण संधी मिळाल्यास शिक्षकांच्या प्रश्नाला अडीअडचणीला सामोरे जावू असेही शेवटी बोलताना नमुद केले. या कार्यक्रमात सत्कारमुर्ती शिवाजीराव साखरे व आदर्श शिक्षकांचा सौ. कव्हेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

 

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920