anandnagri logo
मुख्य बातम्या:

साहित्यीकांनी वेदनामुक्तीसाठी लिखाण करावे

By आनंदनगरी वेब टीम | Thu 29-12-2016 | 12:38:16 pm

फोटो


♦ डॉ.श्रीपाल सबनिस यांचे प्रतिपादन * शेतीमालाला हमी भाव देण्यासह अकरा ठराव मंजूर

                  सचिन काळे
♦  नटवर्य लोटु पाटील व्यासपीठ
सोयगाव - शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा, असा ठराव साहित्य संमेलनात घेतला जातो हे जागरूकतेच लक्षण आहे.लोकप्रतिनिधींनी माणसाच्या विकासासाठी काम करावे तर साहित्यिकांनी वेदनामुक्तिसाठी  सोयगाव येथे संत ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसरात स्वातंत्र्य सेनानी बाबुरावजी काळे साहित्य नगरीत नटवर्य लोटु पाटील व्यासपीठावर 38 व्या मराठवाडा  साहित्य संमेलनाचा समारोप दि.28 संध्याकाळी झाला. अध्यक्षस्थानी डॉ. जनार्दन वाघमारे तर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे ,डॉ श्रीपाल सबनीस, पद्मश्री ना. धो. महानोर, संमेलन स्वागत अध्यक्ष रंगनाथ काळे , कार्याअध्यक्ष प्रकाश काळे , डॅा. कौतीकराव ठाले पाटील , दादा गोरे ,कैलास काळे , डॉ. अग्नीहोत्री, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, डी. के. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव, राज्याशासनाच्या साहीत्य संस्कृति मंडळाने "महाराष्टाचे शिल्पकार "या मालेत लोटु पाटील यांचे चरित्र प्रकाशित करावे , चाळीसगाव ते फर्दापुर या राज्यमार्गाचे रुंदीकरण करावे , सोयगांव तालुक्यात शिरपुर पॅटर्न ची कामे करावी , सोयगांव परिसरातील पर्यटन स्थळास विकसित करावे, मसाप च्या शाखेसाठी सोयगाव न. पं.ने जागा द्यावी असे एकूण अकरा ठराव मांडण्यात आले. दादा गोरे, ठाले पाटील, हरीभाऊ बागडे यांची भाषणें झाली.  सूत्रसंचलन डॉ. शिरीष पवार यांनी तर आभार डॉ. रावसाहेब बारोटे यांनी मानले.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920