anandnagri logo
मुख्य बातम्या:

अजिंठा लेणी शिल्प म्हणजे मराठवाड्यातील गोठलेले काव्य

By आनंदनगरी वेब टीम | Thu 29-12-2016 | 12:36:02 pm


♦ सम्मेलनाध्यक्ष डॉ.जनार्दन वाघमारे यांचे प्रतिपादन
♦ स्वातंत्र सेनानी बाबूरावजी काळे साहीत्य नगरी
सोयगाव - मराठवाडयाने सातशे वर्षे गुलामगिरीत राहून देखील मराठी भाषा वाचवली. अजिंठा लेणी सारखे शिल्प म्हणजे मराठवाडयातील गोठलेले काव्य आहे. महाराष्ट्रात मराठी विद्यापीठ झाले पाहीजे असे प्रतिपादन साहीत्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ जनार्दन वाघमारे यांनी केले .
सोयगांव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालय परिसरात स्वातंत्र सेनानी बाबुरावजी काळे साहीत्य नगरी ,नटवर्य लोटुभाऊ पाटील व्यासपीठावर  38 वे मराठवाडा साहीत्य संमेलनाचे उदघाटन आज झाले. यावेळी उदघाटक म्हणुन माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे होते तर संमेलन अध्यक्ष जनार्दन वाघमारेमाजी आमदार तथा जेष्ठ कवि ना धो महानोर,स्वागतअध्यक्ष रंगनाथ काळे ,कार्यअध्यक्ष प्रकाश काळे माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगने ,नगरअध्यक्ष कैलाश काळे ,संजय गरूड ,मराठवाडा साहीत्य परिषद अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील ,कार्यवाह डॉ दादा गोरे ,जेष्ठ कवी भगवानराव देशमुख ,द्वारकाभाऊ पाथ्रीकर ,यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती .कै लोटुभाऊ पाटील व कै बाबुरावजी काळे यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रजलन करून उदघाटन करण्यात आले .यावेळी दिलीप वळसे पाटिल म्हणाले कि देशात साहीतीकाची पुरस्कार वापसी सुरू आहे अभिव्यक्ति स्वातंत्र्यची गळचेपी होत आहे .व्रुतपत्राचे खप वाढत असून हा एक नववाचाक तयार होत आहे असे मत वळसे यांनी मांडले .रंगनाथ काळे ,कौतिकराव ठाले पाटील ,डॉ राजेंद्र शिंगन ,संजय गरूड आदिंनी मनोगत व्यक्त केले.संमेलन अध्यक्ष डॉ वाघमारे यांनी सांगितले कि बाबुरावजी काळे कमी शिकले होते परंतु त्याना समाज प्रश्नांची जान होती त्यामुळे त्यांनी शिक्षणाची गंगा या भागात आणली .लोटु पाटलांनी शंभर वर्षापुर्वी नाट्य चळवळ सुरू केली ही अभिमानाची बाब आहे महाविद्यालयाने नाट्यविभाग सुरू करावा .मराठी भाषेने सातासमूद्र पार अटलांटिक पार जेन्डा रोवला आहे .बाळ साहित्याची चर्चा करण्याची गरज आहे मूलाबाबत विपुल साहीत्य निर्माण व्हावे .पश्चिम महाराष्ट्रप्रमाणे मराठवाड्यात विज्ञान साहित्य निर्माण झाले पाहिजे.मुस्लिम साहीतीकाना संधी मिळाली पाहिजे."अवघे विश्वची माझे घर "हे फार मोठे उदगार संत ज्ञानेश्वर यांनी काढले त्यांच्यानंतर व अगोदर जगात असे उदगार कुणी काढले नाही .नामदेव र्जानबाइ सारखे कवी महाराष्ट्रात होऊन गेले. मराठवाड्यात सन 1224 ते 1948  पर्यंत  वर्षे गुलामगिरीत राहून मराठी भाषा वाचवली .असे सविस्तरपणे विचार डॉ वाघामारे यांनी मांडले .

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920