anandnagri logo
मुख्य बातम्या:

खटोड प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव 31 डिसेंबरपासून 

By आनंदनगरी वेब टीम | Wed 28-12-2016 | 12:40:10 pm

फोटो


♦सांप्रदायीक कीर्तनासह महाभारत संदेश कथा,
♦ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण सोहळा, 
♦योग,
♦आरोग्य शिबीर, 
♦महिला अत्याचार विरोधी प्रबोधन रॅली,
♦शिक्षण महोत्सव, सामुहिक विवाह, 
♦नामकरण सोहळा महोत्सवाचे प्रमुख आकर्षण 
बीड (प्रतिनिधी)- पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे आपल्या भारतीय संस्कृतीचा विसर पडू नये, तरुणांमध्ये विचारांचे गांभीर्य निर्माण व्हावे तसेच चंगळवादाकडे प्रवृत्त होणाऱ्या मनाला आत्मशांती लाभावी व नववर्षाची सुुरुवात अध्यात्मिक विचाराने व्हावी या उद्दात्त हेतुने स्व.झुंबरलालजी खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या यंदाच्या तेराव्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाला येत्या 31 डिसेंबर 2016 पासून प्रारंभ होत आहे. यंदाच्या महोत्सवात सांप्रदायीक, कीर्तनासह महाभारत संदेश कथा, ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण सोहळा, योग,आरोग्य शिबीर, महिला अत्याचार विरोधी प्रबोधन रॅली,शिक्षण तज्ञांची व्याख्याने, सामुहिक विवाह, नामकरण सोहळा, चित्रकला-पोस्टर्स स्पर्धा, स्वच्छता संदेश आणि देशभ्नतीपर कार्यक्रम व भ्नतीसंगीत हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, संयोजक भरतबुवा रामदासी आणि सचिव सुशील खटोड यांनी दिली. दि.27 रोजी कीर्तन महोत्सवाच्या सभामंडपात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी शुभम खटोड, आशिष खटोड यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. 
या प्रसंगी माहिती देतांना खटोड यांनी सांगितले की, येत्या शनिवार दि. 31 डिसेंबर 2016 रोजी सायंकाळी 6.00 वा. या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. शहरातील जिजामाता चौक, मसरत नगर येथील प्राचार्य शिवाजीराव भोसले अध्यात्मनगरीत आगामी दहा दिवस चालणाऱ्या कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटनाला संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारीत तुका आकाशा एवढा हा गणेश शिंदे व कलावंतांचा संगीतमय कार्यक्रम संपन्न होणार आहे. याच दिवशी रात्री. 8.00 वा. बीड येथील श्री साई नृत्यालय प्रस्तुत सौ.अनुराधा चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थींनीचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल त्यानंतर रात्री 8 वाजता. समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे सांप्रदायीक कीर्तन होईल. कीर्तन महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी तसेच पुढील दहा दिवसात रोटरी ्नलब ऑफ बीड सीटी यांच्यावतीने भाविकांना एकुण 20 हजार वृक्षांचे वाटप करण्यात येणार आहे. यासह कीर्तन महोत्सवात 1 ते 10 जानेवारी दरम्यान पतंजली योग समिती बीडच्यावतीने दररोज पहाटे, 5.30 वाजता ऍड. श्रीराम लाखे यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबीर घेण्यात येईल. नववर्षाच्या प्रारंभी 1 जानेवारी रोजी सकाळी 9.00 वा. कीर्तन महोत्सवाच्या सभामंडपात स्व.श्नतीकुमार केंडे सर यांच्या स्मरणार्थ खुली पोस्टर्स स्पर्धा आणि पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या गटात चित्रकला स्पर्धा घेण्यात येईल. 
या स्पर्धेचे संयोजक म्हणून एस.एस.पुरी आणि एस.एस.क्षीरसागर हे काम पाहतील. याच दिवशी सकाळी 9.00 वा. प्रसिध्द त्वचारोग तज्ञ डॉ.गोविंद काळे यांचे शहरातील विघ्नहर्ता बालरुग्णालयात दुर्धर त्वचारोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले असून, रुग्णांनी संबंधीत रुग्णालयात 31 डिसेंबर 2016 पर्यंत नाव नोंदणी करायची आहे. रोटरी ्नलब ऑफ बीड सीटीच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर होत आहे. याच दिवशी सकाळी 9 ते 2 या वेळेत कीर्तन सभामंडपात पतंजली योग समिती व जिल्हा रुग्णालय बीडच्यावतीने भव्य र्नतदान शिबीर होणार आहे. दुपारी 2 ते 5 या वेळेत जि.प.बीड आयोजित बीड जिल्हयातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, ग्रामसेवक व सर्व कर्मचाऱ्यांसाठी, कोल्हापूर येथील शिक्षणतज्ञ इंद्रजीत देशमुख स्वच्छता व आपले कर्तव्य या विषयावर सुश्राव्य व्याख्यान होईल. या प्रसंगी जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, आयएएस अधिकारी अजित पाटील, उपमुख्यकार्यकारी अधिकारी डी.आर.माळी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी मधुकर वासनीक, शिक्षणाधिकारी (मा.) सुरजप्रसाद जैस्वाल, शिक्षणाधिकारी (प्रा.) शशीकांत हिंगोणीकर यांची उपस्थिती रहाणार आहे. या शिवाय महोत्सवात दि.1 रोजी सुदर्शन धुतेकर प्रस्तुत धुतेकर संगीत विद्यालय बीडच्या विद्यार्थ्यांचा संगीत रजनीचा कार्यक्रम होईल. याच दिवशी सायं.6.30 वा. शिक्षणतज्ञ इंद्रजीत देशमुख यांचे पसायदान विषयावर व्याख्यान होईल. दि. 2 जानेवारी 2017 रोजी दुपारी 5.00 वा. निशीकांत उदार प्रस्तुत आदित्य गिटार संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा संगीत रजनीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायं. 7.00 वा. रो.मोहन हिराचंद पालेशा यांचे सामाजिक संवेदना या विषयावर व्याख्यान होईल. महोत्वात दि.3 रोजी ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण सोहळ्यास प्रारंभ होईल. याच दिवशी सायं. 5.00 वा. सौ. अनघा काळे प्रस्तुत मैफल सप्तसुरांची हा भ्नतीसंगीताचा कार्यक्रम संपन्न होईल. दि. 4 रोजी राष्ट्रसंत प.पू.श्री.गोविंददेव गिरी महाराजांच्या महाभारत संदेश कथेत दुपारी 2 ते 5 या वेळेत प्रारंभ होईल. दि.10 जानेवारी पर्यंत ही कथा चालणार आहे. दि. 4 रोजी सायं. 6 वाजता लेखक दिग्दर्शक मुस्ताक पिरजादे यांचे मी जिंकणारच या विषयावर व्याख्यान होईल. दि. 5 रोजी सायं. 6 वा. जेष्ठ शिक्षणतज्ञ अविनाश धर्माधिकारी यांचे नव्या भारताच्या उभारणीसाठी आपले योगदान या विषयावर व्याख्यान होईल. या प्रसंगी संपादक सुशील कुलकर्णी, शिक्षणतज्ञ बालकिशन बलदवा यांची उपस्थिती राहिल. दि.6 राेजी सायं. 6 वा. शिक्षणतज्ञ यजुर्वेद्र महाजन यांचे शिक्षण व करिअरवर बोलू काही या विषयावर व्याख्यान होईल. दि.7 रोजी सायं. 6 वा. जीवन विद्या मिशनचे प.पू.सद्गुरु प्रल्हाद वामनराव पै यांचे तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर व्याख्यान होईल. दि. 8 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत तपमूर्ती भास्कर गिरी महाराजांचे प्रवचन होईल. त्यानंतर सायं. 6 वा. राष्ट्रसंत भैय्युजी महाराज यांचे अध्यात्मिक व्याख्यान होईल. दि.9 रोजी सायं.5 वा. लासूर स्टेशन येथील अजय मुनोत यांचा प्रतिष्ठानच्यावतीने हृदय सत्कार होईल. अजय मुनोत यांनी आ.प्रशांत बंब यांच्या प्रेरणेतून त्यांच्या मुलीचा विवाह अत्यंत साध्या पध्दतीने करुन तब्बल 90 गोरगरीब कुटूंबांना हक्काची घरे मोफत वाटप केली आहेत. त्यांच्या सामाजिक बांधीलकीचा गौरव संबंध बीडकरांच्यावतीने केला जाणार आहे असे गौतम खटोड यांनी सांगीतले. याच दिवशी सायं. 7 वा. ग्रंथराज ज्ञानेश्र्वरी पारायण सोहळ्याची दिपोत्सवाने सांगता होईल. आणि दि. 10 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत महाभारत संदेश कथेचा समारोप होईल. याच दिवशी सायं.4 वा. श्रध्दा इव्हेंट अहमदनगर प्रस्तुत संगीतमय बारशाचा कार्यक्रम होईल. तसेच जिल्हा रुग्णालय बीड व आदित्य गिटार संगीत विद्यालय यांच्या संयु्नत विद्यमाने स्त्री जन्माचे स्वागत करा, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा या अभियानांतर्गत डिसेंबर 2016 या महिन्यामध्ये जन्मलेल्या कन्यारत्नांचा सामुहिक नामकरण सोहळा कीर्तन महोत्सवात संपन्न होईल. या प्रसंगी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.नागेश चव्हाण, डॉ.संदीप सांगळे यांची उपस्थिती राहील. बीडकर रसिक श्रोत्यांनी या 11 दिवसीय महोत्सवाला सहकुटूंब उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन गौतम खटोड, सुशील खटोड, संयोजक भरतबुवा रामदासी, सौ.प्रज्ञाताई रामदासी यांच्यासह मोहनलालजी खटोड, महावीर खटोड, अभय कोटेचा, सौ.वंदना कोटेचा, निर्मला खटोड, सौ.अनिता खटोड, सौ.मंगल खटोड, शुभम खटोड, सौ.पल्लवी शुभम खटोड, श्रध्दा खटोड, आशीष खटोड, कोमल खटोड यांनी केले आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920