anandnagri logo
मुख्य बातम्या:

विविध मागण्यांसाठी बीडमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर

By आनंदनगरी वेब टीम | Wed 21-12-2016 | 12:53:21 pm

फोटो


बीड(प्रतिनिधी)- नवे पर्व..मुस्लिम सर्व..अशी हाक देत मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातून मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात एकवटला. हक्काच्या आरक्षण मागणीसाठी लाखो समाज बांधव एका तिरंगा झेंड्याखाली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल येथून दुपारी 12 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. सकाळी 8 वाजल्यापासूनच मुस्लिम समाज बांधव हजारोंच्या संख्येने मोर्चास्थळी दाखल झाले होते.  12 वाजता लाखोंच्या संख्येने उपस्थितीत मोर्चाला सामुहिक राष्ट्रगिताने सुरुवात झाली.
आरक्षण, संरक्षण यासह मुस्लिम पर्सनल लॉ  या मागण्यासाठी मूक मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांच्या हातात तिरंगा ध्वज, घोषवाक्यांचे फलक, डोक्यावर फेटे आणि शिस्तबध्द संचलन..मनामध्ये सरकारविषयी संताप दिसून आला. स्टेडीयम पासून निघालेला मोर्चा सुभाष रोउ, माळीवेस, धोंडीपूरा मार्ग बलभीम चौकात पोहचला.  त्या ठिकाणी विविध शाळांमधून देखाव्यांसह आलेले विद्यार्थी, विद्यार्थींनी सहभागी झाले. बलभीम चौकातून कारंजा, राजूरी वेस, बशीरगंज चौक, शिवाजी महाराज चौक, नगर रोड मार्गे लाखोंचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. लाखोंच्या संख्येने मोर्चात सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवानी एकीचे आणि शिस्तीचे दर्शन घडविले.

 

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920