anandnagri logo
मुख्य बातम्या:

कार्यकर्त्यांनो गाफील राहु नका, जोमाने  कामाला लागा - राज्यमंत्री खोतकर

By आनंदनगरी वेब टीम | Thu 15-12-2016 | 11:59:09 am

फोटो


♦ आगामी निवडणुकीचा अनुषंगाने गटनिहाय दौरे करणार - अंबेकर 
जालना (प्रतिनिधी) - आगामी काळामध्ये जालना जिल्हयात जि. प. व पं. स. सार्वत्रीक निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या अनुषंगाने जालना जिल्हा शिवसेना कार्यकारणीची बैठक जि. प. उपाध्यक्ष अनिरूद्ध खोतकर यांचा निवासस्थानी पार पाडली.
             यावेळी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करतांना राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले की, जिल्हयामध्ये शिवसेनेला ग्रामीण भागामध्ये सर्वत्र अनुकुल वातावरण असुन शिवसेनेेने वेळोवेळी शेतकरी व सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर आवाज उठविला असुन वीज, रस्ते, पाणी, दुष्काळ अशा विविध प्रश्नावर वेळोवेळी आंदोलने करून जनतेचे प्रश्न सोडविले आहेत. शिवसेनिकांने आगामी जि. प. व पं. स. निवडणुकीसाठी झटुन कामाला लागावे. जिल्हा परिषदेत शिवसेना- भाजपाची सत्ता असुन अनेक कामे मागील पाच वर्षात जिल्ह्यात करण्यात आले असुन त्याचा फायदा शिवसेनेला होणार आहे. तसेच राज्यात सुध्दा युतीचे सरकार असुन अनेक निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आले असुन सामान्यात सामान्य माणसाला फायदा व्हावा हा विचार करून शासन निर्णय घेत असुन शेती व संबंधीत योजना शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सामान्य माणसांपर्यत घेवुन जाण्यात व त्याचा त्यांना लाभ मिळवून द्यावा. सदरील निवडणुक महत्वाची असुन कार्यकर्त्यांनी आता गाफील राहु नये.
            यावेळी जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर म्हणाले की, जालना जिल्हा परिषद व पं. स. निवडणुका तोंडावर आल्या असुन  शिवसेनेच्या वतीने पुढील आठवडयात मा. राज्यमंत्री ना. अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्हाभर शिवसेना जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी प्रत्येक जि. प. चा गटनिहाय दौरा करणार असुन त्या माध्यामातुन इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यासह सामान्य जनतेची व शिवसेनीकांची मते आजमाहुन घेणार आहोत. या बैठकीला जि. प. उपाध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, जि. संघटक मोहन अग्रवाल, ता. जि. प्रमुख बाबासाहेब इंगळे, माजी सभापती भाऊसाहेब पाऊलबुध्दे, युवा सेनेचे राज्यकार्यकारणी सदस्य जगन्नाथ काकडे, युवा सेनेचे जि. प्रमुख भाऊसाहेब घुगे, जिल्हा प्रमुख ए. जे. बोराडे, किसान सेेनेचे जिल्हा संघटक भानुदास घुगे, द. आघाडी चे जिल्हा प्रमुख ऍड. भास्कर मगरे आदीची उपस्थिती होती.

 

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920