anandnagri logo
मुख्य बातम्या:

मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला

By आनंदनगरी वेब टीम | Thu 15-12-2016 | 11:19:06 am


♦ बीड जिल्ह्यातील मादळमोहीत बसवर दगडफेक
बीड,(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असून बुधवारी गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे एका बसवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दगडफेकीत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरात लाखोंच्या संख्येने मोर्चे निघत आहेत. राज्य शासन मराठा आरक्षण प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याचे पाहून समाजात संताप व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळी 9.30 वाजता नारायणगड-गेवराई (बस क्रं.एम.एम.40, एन.7179) या गाडीवर मादळमोही येथील काही तरूणांनी दगडफेक केली. या दगडफेकीत बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.बसवर दगडफेक करणारे युवक हे स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाले असून या प्रकरणी तब्बल 19 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920