anandnagri logo
मुख्य बातम्या:

बीड, परळीत राष्ट्रवादी, गेवराई, धारूर, माजलगांवात भाजप तर अंबाजोगाईत कॉंग्रेस विजयी

By आनंदनगरी वेब टीम | Tue 29-11-2016 | 12:24:49 pm


बीड - संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या परळी, बीडमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली. तर गेवराई, धारूर,माजलगावमध्ये भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमदवार निवडून आले. अंबाजोगाईत कॉंग्रेसने आपला गड राखला आहे. बीडमध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.भारतभूषण क्षीरसागर विजयी झाले तर एमआयएम दुसऱ्या क्रमांकाचे मते घेतले. 
जिल्ह्यातील सहा नगर पालिकेसाठी रविवारी मतदान पार पडले होते. सोमवारी सर्व नगर पालिकेचे निकाल लागले.बीड नगर पालिकेसाठी षटरंगी निवडणुक झाली होती. क्षीरसागर घरामध्ये फुट पडल्यामुळे या निवडणुकीला चांगलीच रंगत आली होती. अटीतटीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला 19, काकु-नाना विकास आघाडीला 18 तर पहिल्यांच बीड पालिकेमध्ये निवडणूक लढविणाऱ्या एमआयएम हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. केवळ 1624 मताधिक्याने एमआयएमचा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी पराभुत झाला आहे असून 9 नगरसेवक विजयी झाले आहे. शिवसेना 3 ठिकाणी विजयी झाली तर भाजपाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. आ.विनायक मेटेंच्या शिवसंग्रामला तर खातेही उघडता आले नाही. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी नगर पालिकेमध्ये पालकमंत्री पंकजाताई मुंडे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यात लढत झाली. या अटीतटीच्या लढतीमध्ये ना.धनंजय मुंडे यांनी बाजी मारली. अंबाजोगाई नगर परिषदेच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत अखेर कॉंग्रेसच्या रचना मोदी यांनीच बाजी मारली असून  मते घेऊन त्या विजयी झाल्या आहेत. माजलगावमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, जनविकास आघाडी, शिवसेना अशी तिरंगी लढत झाली होती. यामध्ये भाजनाने पुरस्कृत केलेले सहाल चाऊस विजयी झाले आहे.गेवराई नगर पालिकेत भाजप-राष्ट्रवादी आणि आघाडी तिरंगी लढत झाली होती. दोन्ही पंडितांनी वेगळी चुल मांडून निवडणुक लढवली होती. दोन्ही पंडितांना आ.लक्ष्मण पवार यांनी जबरदस्त हाबाडा दिला. भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जवंजाळ सुशिल वैजीनाथ हे 9 हजार 392 मतांनी विजयी झाले. भाजपाचे 18 नगरसेवक निवडून आले असून राष्ट्रवादीला फक्त 1 जागा मिळाली आहे. माजी आ.बदामराव पंडित यांच्या आघाडीवर नामुष्की आली. त्यांना खातेही उघडता आले नाही.धारूर नगर पालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी भाजपाने आपली प्रतिष्ठापणा लावली होती. गत निवडणुकीत ही नगर पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीला धुळ चारत भाजपाच्या पदरात यश टाकले आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ.स्वरूपसिंह हजारी 487 मतांनी विजय झाले असून भाजपाचे 9, राष्ट्रवादीचे 6 आणि जनविकास आघाडीचे 2 नगरसेवक निवडून आले आहेत.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920