anandnagri logo
मुख्य बातम्या:

जाती-पातीत न अडकता सर्व समाजासाठी काम करणाऱ्या ना.धनंजय मुंडेंना साथ द्या-आ.चव्हाण

By आनंदनगरी वेब टीम | Mon 21-11-2016 | 11:51:16 am

फोटो


परळी वै (प्रतिनिधी):-ना.धनंजय मुंडे या नेतृत्वाने आपल्या कतृत्वाने जानते राजे खा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांचे मन जिंकले आहे. महाराष्ट्रातील राजकारणात अल्पावधीत स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण करणारे त्यांचे नेतृत्व परळीला लाभले आहे हे परळी करांचे भाग्य आहे. त्यामुळे कोणत्याही जाती-पातीच्या राजकारणात न अडकता सर्व समाजासाठी अहो रात्र कष्ट करणाऱ्या ना.धनंजय मुंडे यांना नगर पालिका निवडणुकीत साथ द्या असे आवाहन विधान परिषदेचे सदस्य तथा मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आ.सतिष चव्हाण यांनी केले आहे.
    नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आ.सतिष चव्हाण यांनी शनिवारी परळीला धावती भेट देताना थर्मल कॉलीन येथील सुर्यकांतराव देशमुख, गणेशपार भागातील प्रभाकरराव देशमुख, उत्तमराव देशमुख मालक, माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख, तळभागातील अभिजीत देशमुख, जलालापुर येथे भेट देवुन कॉर्नर बैठकींच्या माध्यमातुन मतदारांशी संवाद साधला. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय असो की धनगर समाजाच्या आरक्षणाचा, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय असो की लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा ! या सर्व समाजांसाठी ना.धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेच्या सभागृहात आवाज बुलंद केला आहे. सभागृहा बाहेरही शेतकरी, सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी संघर्ष करणारे नेतृत्व आपण जवळुन पाहत आहोत. सर्व समाजांच्या आरक्षणाचा विषय असो की सामान्यांच्या अडीअडचणींसाठी सरकारला वाकवुन योग्य निर्णय घेण्याची क्षमता आज या तरूण नेतृत्वामध्ये आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षालाच नव्हे तर महाराष्ट्राला त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. असे नेतृत्व परळीत घडले हे परळीकरांचे भाग्य आहे. या नेतृत्वाला नगर पालिका निवडणुकीत ताकद द्या. जाती-पातीच्या आव्हानाला बळी न पडता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन आ.चव्हाण यांनी केले.  या बैठकांना ज्येष्ठ नेते सोमनाथअप्पा हालगे, उत्तमराव देशमुख मालक, नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख, वाल्मिकअण्णा कराड, प्रा.डॉ.विनोद जगतकर, सौ. निलाबाई रोडे, प्रभाकरराव देशमुख, एस.व्ही.माने, टोंपे साहेब, डि.जी.शिंदे, वाघमारे सर, शरद सोळंके, शंकर कापसे, सुरेंद्र कावरे, श्रीकांत माने, कांबळे सर, नानासाहेब सोळंके, प्रा.सुनिल चव्हाण, सुनिल देशमुख, अमर देशमुख, जयराज देशमुख, धिरज देशमुख, रूपेश देशमुख, राधाकिशन साबळे, आत्माराम काळे, पांडुरंग काळे, केशव साबळे, राजाभाऊ पौळ, पप्पु काळे, महादेव रोडे, कोपरे सर, प्रभाग एक मधील उमेदवार सम्राट विजय गंडले, सौ.माधुरी अशोक भोसले, सौ.कमलबाई रावजी कुकर, सौ.राजश्री धनंजय देशमुख अन्वर मिस्किन, सौ.प्रियंका महादेव रोडे, अजय जोशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाते.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920