anandnagri logo
मुख्य बातम्या:

500 रुपयांच्या 2000 नोटा जप्त

By आनंदनगरी वेब टीम | Sat 12-11-2016 | 11:33:16 am


उस्मानाबाद (वृत्तसंस्था)- उस्मानाबादमध्ये 500 रुपयांच्या 2000 नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. निवडणूक पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. एका वाहनातून  लाखांची रक्कम परभणीच्या दिशेने नेली जात असल्याची माहिती निवडणूक पथकाला मिळली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बार्शीहून परभणीकडे निघालेल्या स्कॉर्पियो गाडीतून निवडणूक पथकाने 10 लाख रुपये जप्त केले आहेत. सरकारने चलनातून रद्द केलेल्या 500 रुपयांच्या दोन हजार नोटा या स्कॉर्पियो गाडीत सापडल्या आहेत. निवडणूक पथकाने जप्त केलेली ही रक्कम पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. स्कॉर्पियोच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
उस्मानाबादमधील येरमाळ्याजवळ निवडणूक पथकाने कारवाई केली. नगरपालिका निवडणुकांसाठी हा पैसा वापरला जाणार होता, असा संशय व्यक्त करण्यात येतो आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्याने बेहिशेबी पैसा बाळगऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. बॅंका, पोस्टामध्ये जाऊन नोटा बदलण्यावर 4 हजारांची मर्यादा आहे. त्यामुळे बेहिशेबी रक्कम बाळगण्यांना त्यांच्याकडे असणाऱ्या जुन्या नोटा बदलणे अवघड झाले आहे. राज्यभरात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मात्र सरकारने पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटाच चलनातून बाद केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920