anandnagri logo
मुख्य बातम्या:

लेगिन्स खरेदी करताना लक्षात ठेवा या टिप्स

By आनंदनगरी वेब टीम | Tue 17-01-2017 | 12:22:23 pm

फोटो

घालायला कम्फर्टेबल, दिसायला सुंदर अशा लेगिन्सनी स्त्रियांच्या कपड्यांमध्ये विशेष स्थान मिळवले आहे. ऑल पर्पज वापरासाठी अत्यंत सोयीचे असलेले लेगिन्स खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते.
आम्ही दिलेल्या या टिप्स तुम्हाला योग्य लेगिन खरेदी करण्यात नक्की उपयोगी ठरतील.
1. फक्त ब्लॅक अँड व्हाईटला चिकटून राहू नका
सामान्यतः सर्व स्त्रियांकडे काळे आणि पांढरे लेगिन्स असतात. हे दोन्ही युनिव्हर्सल रंग कशावरही मॅच होत असले तरी स्वतःकडे विविध ब्राईट रंगांच्या लेगिन्सचे कलेक्शन असायला हवे.
2. लेगिन्ससोबत योग्य फूटवेअर निवडा
तुम्ही लेगिन्ससोबत कोणते फूटवेअर घातले आहे हे महत्वाचे आहे. क्लासिक, हाय हील सॅंडल लेगिन्सवर चांगली दिसत नाही. प्लॅटफॉर्म शूज किंवा बॅले फ्लॅट उत्तम पर्याय आहे. 
3. जीन्स समजून लेगिन्स खरेदी करू नका
लेगिन्स म्हणजे जीन्स नव्हे. त्यामुळे त्यांना स्टॅंडअलोन पर्याय म्हणून वापरू नका. लेगिन्स नेहमी कुर्ती, लॉंग टॉप, ड्रेस किंवा लांब शर्टवरच घालायला हवे. छोट्या टॉपवर लेगिन विचित्र दिसते. 
4 लेगिन खरेदी करताना 
कापड व चमक याकडे लक्ष द्या
लेगिनचे कापड चांगल्या दर्जाचे असायला हवे. त्यावरील चकाकी नीट असावी. खराब कापडाचे लेगिन दिसायला वाईट दिसते. काही दिवसांनी गुडघ्यातून सैल होते. या गोष्टींकडे लक्ष देऊन लेगिन घ्या. 
5. स्कीन टाईट पेहराव घालू नका.
 आधीच लेगिन स्कीन टाईट असतात. त्यावर जर कुर्तीदेखील स्कीन टाईट असेल तर तुम्ही अगदीच अवघडल्याप्रमाणे दिसाल. लठ्ठ मुलींना तर ते खराब दिसेलत पण बारीक मुलीही असा पेहरावात अधिक बारीक दिसतात. त्यामुळे योग्य फिटिंगची सुटसुटीत कुर्ती घाला.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920