anandnagri logo
मुख्य बातम्या:

पायांच्या थकव्यासाठी  घरगुती उपाय..

By आनंदनगरी वेब टीम | Sat 14-01-2017 | 12:42:04 pm

फोटो

सध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत एका जागेवर उभे राहिल्याने पायाला थकवा जाणवू लागतो. या परिस्थितीत घरगुती उपायांनी सुद्धा आराम मिळू शकतो. एखादे वेळी पायाचे दुखणे वाढूनते गुडघ्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे गुडघे दुखू लागतात. 
►अशा वेळी एक टेबल घेवून ऐक पाय जमिनीवर आणि दुसरा टेबलावर सरळ ठेवावा. पाठीत थोडं वाकून हाताने टेबलावरील पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करावा. ही क्रिया पाच सेकंदांपर्यंत करावी. त्यानंतर पायाची अदला बदल करावी. हात पायाच्या अंगठ्यापर्यंत पोहोचले नाहीत, तरी ते शक्य तेवढे लांबावेत. पायांना नियमितपणे मालिश केल्यानेही पायांचा थकवा दूर होतो. मात्र मालिश करताना चांगल्या प्रकारचे कोल्ड क्रीम किंवा खोबरेल तेलाचा वापर करावा. मालिशमुळे रक्तभिसरण उत्तम प्रकारे होवून स्नायूंना आराम मिळतो. 
►पायांवर अथवा पायांच्या बोटांना सूज आली असेल, तर कोमट पाण्यात थोडे मीठ टाकावे. त्या पाण्यात सुमारे दहा मिनटे पाय ठेवावेत. पायांची सूज आणि थकवा दोन्ही कमी होतात. पायांना थकवा जाणवू नये म्हणून खूप कडक किंवा उंच टाचांच्या चप्पल किंवा सॅंडल्स वापरणे टाळावे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920