anandnagri logo
मुख्य बातम्या:

पांढऱ्या केसांची अशी घ्या काळजी

By आनंदनगरी वेब टीम | Wed 04-01-2017 | 12:40:30 pm

फोटो


डोक्यावर पांढरा केस दिसल्याबरोबर सर्वात आधी आपण काय करता? विचार करता पांढरे केस तोडू किंवा डाय करू? कोणता डाय वापरू? असे अनेक प्रश्न डोक्यात चाललेले असतात. ज्यांचे योग्य उत्तर सापडत नाही. अशाच अनेक गोष्टी आहे जे आम्ही येथे शेअर करणार आहोत की काय करावे अथवा काय नाही. 
केस तोडू नये
केस तोडल्याने अधिक पांढरे केस येत नाही तरी केस तोडल्यामुळे पांढऱ्या केसांची बनावट नैसर्गिक पिग्मेंटेड केसांपेक्षा अधिक कडक असते. आणि आपण याला खेचल्यावर तिथे पुन्हा पांढराच केस उगून येतो. म्हणून पांढरे केस तोडू नये. पांढऱ्या केसांकडे दुर्लक्ष करू नका
आपल्या डोक्यावरील पिग्मेंटेड हेअर्स आनुवंशिक संरचनांवर अवलंबून असतं. अनेकदा हे जिंक आणि आयरनच्या कमीमुळे असतं. म्हणून पूर्ण केस पांढरे दिसायला लागतील यापूर्वीच कारण माहीत करून उपाय शोधा. 
धूम्रपान केल्याने शरीरावर वयाच्या प्रभाव लवकर दिसून येतो. यामुळे केवळ मेलनिनचे स्तरच कमी होत नाही तर केस मुळापासून कमजोर होतात, त्यांची शेडिंग खराब होते आणि आपल्याला टक्क्लही पडू शकते. म्हणूनच केस हवे असतील तर धूम्रपान करू नये. 
आमोनिया डाय वापरणे टाळा
केसांना आमोनिया मिश्रित डाय लावू नये. याने आपल्या तात्पुरतं समस्या सुटली असं वाटतं परंतू काही दिवसातच केस कमजोर होऊन गळू लागतात. याऐवजी ऑर्गेनिक डाय वापरू शकता. 
वेळोवेळी हेअर कट घ्या: केस पांढरे व्हायला लागले की यांची विशेष काळजी घ्या. यांना सुळसुळीत ठेवा ज्याने पांढरे केस उठून दिसणार नाही. प्रत्येक 6 ते 8 आठवड्यानंतर हेअर कट घ्या. 
रोज केस धुऊ नये
केसांना रोज धुतल्याने त्यातील नैसर्गिक तेल निघतं आणि केस कमजोर होऊन गळतात. यामुळे पांढऱ्या केसांवर काही प्रभाव पडत नसतो म्हणून केस रोज धुण्याऐवजी आठवड्यातून दोन किंवा तीनदा धुवावे. 
 एकच शेपू वापरू नका
एकाच ब्रॅंडचा शेपू अधिक काळापर्यंत वापरू नका. केसांचा रंग आणि बनावट दर्शवतं की आपल्या परिवर्तनाची गरज आहे. अशात असा प्रॉडक्ट वापरा जो पांढऱ्या केसांच्या हिशोबाने तयार केलेला असेल. 

लिंबाने धुवा
अनेकदा घरगुती उपाय प्रभावी सिद्ध होतात. जसे 2 कप गरम पाण्यात एक चतुर्थांश कप लिंबाचा रस मिक्स करा. शेपू केल्यानंतर केस याने धुवा. सायट्रिक ऍसिड पांढऱ्या केसांचा रंग काळं करण्यात मदत करतं. 
प्रोटीनशी तडजोड नाही
आपण घेत असलेल्या आहाराचा आपल्या केस आणि त्वचेवर प्रभाव पडतो. व्हिटॅमिन बी आपल्या केसांना दीर्घायुष्य देण्यात फायदेशीर आहे. म्हणून पातळ मांस, अंडी, आणि कुरकुरीत भाज्या खाव्या ज्याने केस काळे, दाट आणि चमकदार होतात. 
 अल्कोहल मिश्रित उत्पाद वापरू नये
पांढरे केस जाड आणि कडक असतात आणि अल्कोहल उत्पाद यांना अधिक कुरळे आणि कडक करतात. म्हणून असे उत्पाद वापरू केसांना जाड करण्यापेक्षा त्यांना हलके राहू द्या. केसांना मोकळा श्वास घेऊ द्या. 

कलर करण्यापूर्वी रिसर्च करा
जर आपण केसांना कलर करण्याचा निर्णय घेतला असेल तर आधी त्यावर रिसर्च करा. आपला निर्णय या तीन प्रमुख गोष्टीवर आधारित असला पाहिजे: कोण-कोणते पर्याय आहे, नंतर केसांची काळजी कशी घ्यावी लागेल आणि कलर किती दिवस टिकेल. 

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920