anandnagri logo
मुख्य बातम्या:

भर मैदानातच भिडले दोन पाकिस्तानी क्रिकेटर!

By आनंदनगरी वेब टीम | Fri 16-12-2016 | 11:58:27 am

फोटो


♦ ऑस्ट्रेलियाच्या मॅचआधी घाबरले पाक क्रिकेटर्स 
कराची (वृत्तसंस्था)- ब्रिसबेनमध्ये सराव सत्रात पाकिस्तानी खेळाडू वहाब रियाज आणि यासिर शाह हे मैदानाताच एकमेकांना भिडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हे प्रकरण पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड (पीसीबी)नं गंभीरपणे घेतलं आहे.
पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी मीडियाला माहिती दिली की, फुटबॉल खेळत असताना झालेल्या घटनेनं मी खूपच निराश आहे. शहरयार म्हणाले की, मला माहित नाही की, नेमकं काय झालं. कारण की, आतापर्यंत पाकिस्तानी संघ शिस्तबद्ध आणि त्यांच्यात एकजूट  होती. पण मैदानावर जे काही झालं तो शिस्तबद्धपणा नाही. आम्ही या घटनेचा रिपोर्ट मागवला आहे.
या घटनेचा अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच जर यामध्ये खेळाडू दोषी अडकल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाईही करण्यात येईल असं शहरयार यांनी सांगितलं. दरम्यान, दोन पाकिस्तानी खेळाडू सरावादरम्यान मैदानातच भिडले होते. याचे फोटो आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये छापण्यात आले आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या मॅचआधी घाबरले  पाक क्रिकेटर्स 
 पाकिस्तानी खेळाडू आपसातच भिडले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या विरूद्धच्या पहिल्या कसोटीआधी पाकिस्तानी क्रिकेटर्स वहाब रियाज आणि यासिर शाह भिडले. टीमच्या ट्रेनिंग सेशनदरम्यान ही घटना घडली. त्यावेळी सर्व खेळाडू फुटबॉल खेळत होते. मात्र, प्रकरण दडपण्यासाठी पाकिस्तानी टीमच्या अधिका-यांनी अशी काही घटना घडले नसल्याचे सांगितले. फोटोज होताहेत वायरल, शाहने दिला वहाबला धक्का....
► या घटनेचे जे काही फोटो समोर आले आहेत त्यानुसार पाकिस्तानी बॉलर यासिर शाह आपला सहकारी खेळाडू वहाब रियाजला धक्का देताना दिसत आहे.
► त्यावेळी पाकिस्तानी टीम प्रॅक्टिस सेशनमध्ये फुटबॉल खेळत होती. तेव्हा शाहने वहाबला धक्का दिला होता. 
►ऑस्ट्रेलिया विरूद्ध पहिल्या टेस्टमध्ये वहाब टीमचा भाग होता तर, यासिर शाह दुखापतीने खेळू शकणार नाही. 
►आपल्या माहितीसाठी हे की, ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान संघ मागील 11 दौ-यापैकी एकही मालिका जिंकू शकला नाही.
►मॅनेजमेंटने प्रकरण दाबण्याचा केला प्रयत्न-
►एकमेंकाना भिडल्यानंतर दोन्ही खेळाडूंना कोच मिकी आर्थरने वेगळे केले आणि नंतर ट्रेनिंग सेशनमधून बाहेर काढले.
►या घटनेनंतर पाकिस्तानी टीमचे अधिकारी अमजद हुसैन यांनी सांगितले की, दोघांत झालेला प्रकार किरकोळ आहे.
►दोन्ही खेळाडूंकडून गैरसमजातून हे घडले तसेच दोघांनी एकमेंकांची माफी मागितली आहे. आता सर्व काही ठीक आहे.

 

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920