संयुक्त राष्ट्राच्या अपात्कालीन निधीसाठी भारताकडून 5 लाख डॉलर्स
By आनंदनगरी वेब टीम | Thu 15-12-2016 | 11:19:13 am
न्यूयॉर्क (वृत्तसंस्था)- संयुक्त राष्ट्राच्या 12016-17 या वर्षाच्या आपात्कालीन निधीसाठी भारताने लाख डॉलर्सची मदत करण्याची घोषणा केली आहे. ही माहिती संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी अभियानाचे राजदूत अंजनी कुमार यांनी उच्चस्तरीय संकल्प परिषदेत दिली. भारताने आजवर या निधीसाठी 60 लाख डॉलर्सची मदत केली आहे. देशभरात मानवी दृष्टीकोनातून ज्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, त्याचा सामना करण्यासाठी केवळ आंतरराष्ट्रीय स्तरातून मिळणारा प्रतिसाद पुरेसा नाही, असे ते म्हणाले.भारताने अफगाणिस्तान, मालदीव, नेपाळ, सोमालिया, श्रीलंका आणि येमेनमध्ये त्सुनामी, भूकंप आणि चक्रीवादळासारख्या आपात्कालीन परिस्थितीत मदत कार्यात सहकार्य केले आहे, असे अंजनी कुमार म्हणाले. यासाठी काही प्रतिष्ठान, कंपन्या, धर्मादाय संस्था आणि व्यक्ततींकडूनही मदत केली जाते.
व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California