जेवणानंतर थंड पाणी पिने शरीरासाठी अपायकारक
By आनंदनगरी वेब टीम | Tue 07-03-2017 | 11:16:10 am
फोटो
उन्हाळा असो वा पावसाळा साधे पाणी पिण्यापेक्षा थंड पाणी पिणे काहींना आवडते. जेवताना तसेच जेवणानंतरही अनेकांना थंड पाणी पिण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या शरीरासाठी किती अपायकारक आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
जेवणानंतर थंड पाणी प्यायल्यास याचा थेट परिणाम तुमच्या पाचनशक्तीवर होतो. ज्यामुळे शरीराची प्रतिकारक्षमता कमी होते.
जेवणानंतर लगेचच थंड पाणी प्यायल्यास त्याचा थेट परिणाम पित्ताशयावर होतो. आपल्या शरीराचे सामान्य तापमान डिग्री सेल्सियसपर्यंत असते. त्यासाठी साधे पाणी पिणे आवश्यक असते.
तसेच अधिक थंड पाणी प्यायल्याने टॉन्सिल्सचाही त्रास होण्याचा संभव असतो. जेवणानंतर थंड पाणी पिण्याच्या सवयीमुळे हार्ट ऍटकचा धोका वाढतो. तसेच थंड पाणी प्यायल्याने पाचनक्रिया मंदावते. यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो.
व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California