anandnagri logo
मुख्य बातम्या:

म्हणून रणवीरवर बिग बी नाराज

By आनंदनगरी वेब टीम | Fri 14-07-2017 | 08:00:16 pm

फोटो


मुंबई - बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेकांच्याच नजरा असतात. त्यातही बिग बी अमिताभ बच्चन यांचे ट्विट्‌स आणि काही पोस्ट विशेष आकर्षणाचा विषय ठरतात. अशीच एक पोस्ट सध्या अनेकांचं लक्ष वेधत आहे. पण, या पोस्टमध्ये बिग बी काहीसे रागावल्याचं पाहायला मिळतायत. बिग बींना कोणाचा राग आला, असा प्रश्न तुम्हालाही पडला ना?
शहेनशहा अमिताभ बॉलिवूडच्या बाजीराववर म्हणजेच अभिनेता रणवीर सिंगवर रागावले आहेत.  जुलैला रणवीरचा वाढदिवस होता. या खास दिवसाच्या निमित्ताने अनेकांनीच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यामध्येच अमिताभ बच्चन यांच्या नावाचाही समावेश आहे. पण, व्यस्त कामामुळे किंवा इतर कोणत्या कारणामुळे रणवीर त्यांच्या मेसेजला रिप्लाय देऊ शकला नाही. त्यामुळे बिग बींनी एक ट्विट करत रणवीरला या गोष्टीची जाण करुन दिली.मुख्य म्हणजे रणवीरने त्यानंतर शुभेच्छा देणाऱ्यांचे आभारही मानले. पण, यामध्येही तो बिग बींचे आभार मानायचे विसरुनच गेला. त्यानंतर बच्चन यांनी रणवीरला उद्देशून आणखी एक ट्विट केलं. अरे. माझ्याबद्दल काय विचार आहे? वाढदिसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी तुला मेसेज केला होता. पण, मला त्याचं काहीही उत्तर मिळालं नाही. त्यावर तुझं काही उत्तर आलं नाही. तो मेसेज तू पाहिलास का?, असं ट्विट त्यांनी केलं. आता खुद्द बिग बींनीच नाराजी व्यक्त केल्यावर त्यांच्या ट्विटला उत्तर न देण्याची रणवीरची काय बिशाद.या दिग्गज अभिनेत्याच्या ट्विटला उत्तर देत रणवीर म्हणाला, त्या एका मेसेजशिवाय मी इतर सर्वांच्याच मेसेजला उत्तर दिलं. मी आता ते मेसेजेस पुन्हा तपासल्यावर लक्षात आलं की, शुभेच्छा देणाऱ्यांच्या यादीत सुरुवातीच्या काहीजणांमध्ये तुमचं नाव होतं.. या ट्विटनंतर रणवीरने आणखी एक ट्विट करत बिग बींचे आभार मानले. या लहान गोष्टीच तुम्हाला महानपण देतात असं रणवीर म्हणाला.
 

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920