anandnagri logo
मुख्य बातम्या:

माझ्या भूमिकेला फार कमी महत्त्व दिले जायचे- भव्य गांधी

By आनंदनगरी वेब टीम | Fri 03-03-2017 | 12:44:29 pm

फोटो


मूंुबई (वृत्तसंस्था) - तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या वेगळ्या आणि हलक्याफुलक्या स्वरुपाने आजवर अनेकांची दाद मिळवली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. त्यातही तारक मेहता मधील काही खास व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष आवडीच्या आहे. त्यातीलच एक व्यक्तिरेखा म्हणजे टप्पूची. पण, तिपेंद्र गडा म्हणजेच सर्वांचा लाडका टप्पू म्हणून प्रसिद्ध असणारा अभिनेता भव्य गांधी याने मालिकेला रामराम ठोकला आहे. काही महिन्यांपूर्वी भव्यने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
भव्यने मालिका सोडण्याचा निर्णय का घेतला असावा हाच प्रश्न अनेकांच्या मनात राहून राहून घर करत आहे. पण, यामागचे खरे कारण स्पष्ट झाल्यावर अनेकांनीच भव्यच्या या निर्णयाचे स्वागत केले. मालिकेच्या निर्मात्यांकडून आपल्याकडे सतत दुर्लक्ष झाल्यामुळे मी हा निर्णय घेतल्याचे भव्यने स्पष्ट केले. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत भव्यने याबाबतचा खुलासा केला आहे. मालिकेच्या निर्मात्यांना मी माझ्या भूमिकेबद्दल नेहमीच सांगत आलो होतो. पण, त्याबद्दल कोणताच सकारात्मक प्रतिसाद आपल्याला मिळाला नाही, असे भव्यने सांगितले. माझ्या भूमिकेला जास्त वाव नाही म्हणून मी ही मालिका सोडत आहे असे नाही तर, या व्यक्तिरेखेमध्ये फार क्षमता असूनही याकडे पाहिजे तेवढे महत्त्व दिले जात नव्हते. कुठेतरी हे पात्र वगळले जात होते. मी यासंबंधी नेहमीच मालिकेच्या निर्मात्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, असे भव्य म्हणाला. या मालिकेची सुरुवात झाल्यापासूनच भव्य या मालिकेचा भाग होता. पण, आता एक अभिनेता म्हणून आपल्याला अभिनय कौशल्य आणखीन खुलवायचे असून हीच योग्य वेळ आहे असेही भव्यने स्पष्ट केले. मला ठाऊक आहे की एक अभिनेता म्हणून माझी कला खुलवण्याची ही योग्य वेळ आहे. जीवनात पुढे जाण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. या (टप्पू) व्यक्तिरेखेपलीकडे जात आपण अभिनय केला पाहिजे असा माझा विचार होता. आता मी मोठ्या पडद्यावरही दिसू शकतो आणि मला खात्री आहे की, प्रेक्षक मला तिथेही तेवढे प्रेम देतील, अशी अपेक्षा भव्यने यावेळी व्यक्त केली. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सुरुवातीपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 
या मालिकेतील प्रत्येक पात्राची एक वेगळीच ओळख आहे. प्रसिद्ध विनोदी लेखक तारक मेहता यांच्या दुनियान उंधा चष्मा या सदरावर तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे कथानक आधारलेले आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920