anandnagri logo
मुख्य बातम्या:

पॅडमॅनमधील भूमिका  कठीण- राधिका आपटे

By आनंदनगरी वेब टीम | Fri 03-03-2017 | 12:44:12 pm

फोटो


मुंबई (वृत्तसंस्था) - अक्षय कुमार लवकरच आर बल्की दिग्दर्शित पॅडमॅन या चरित्रपटात दिसणार आहे. हा सिनेमा उद्योगपती पद्मश्री अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनावर आधारित आहे. अरुणाचलम यांनी कमी पैशांत सॅनिटरी पॅड बनवायची मशीन बनवली. सोनम कपूर आणि राधिका आपटे यांना या सिनेमासाठी करारबद्ध करण्यात आले आहे. या दोघींचीही व्यक्तिरेखा या सिनेमात फार महत्त्वपूर्ण आहेत. एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात हे निश्चत झाले आहे की या सिनेमात अक्षयच्या बायकोची भूमिका राधिका आपटे करणार आहे.
राधिका म्हणाली की, मार्चपासून या सिनेमाचे चित्रिकरण सुरु होईल तर या आठवड्यात भूमिकेची तयारी करण्यात येईल. माझी व्यक्तिरेखा ही शुद्ध हिंदी बोलणारी आहे त्यामुळे सध्या मी माझ्या बोलण्याच्या शैलीवर लक्ष केंद्रीत करत आहे. माझे अक्षय आणि सोनमसोबत संहितेचे वाचनही झाले. मी संहितेला आवश्यक असलेल्या व्यक्तिरेखेसारखे वागावे तसेच बल्की सरांना माझ्याकडून जसे काम अपेक्षित आहे ते करण्याचा माझा प्रयत्न राहील.
राधिका या सिनेमात अक्षयच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. याबद्दल बोलताना राधिका म्हणाली की, या सिनेमात अक्षयची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. असे असले तरी त्याच्या पत्नीची व्यक्तिरेखाही फार महत्त्वाची आहे. काही सिनेमांमध्ये तुमची व्यक्तिरेखा लहान आहे की मोठी ही गोष्ट गौण ठरते. उलट तुमच्या त्या व्यक्तिरेखेमुळे ती गोष्ट किती मजबूत होते याला महत्त्व असते. माझ्या व्यक्तिरेखेमध्येही असे अनेक प्रसंग आहेत जे माझी भूमिका अधिक बळकट बनवतात. यावेळी राधिकाने अक्षय आणि सोनमचेही कौतुक केले.
राधिका म्हणाली की, मी अक्षयचे सिनेमे बघतच मोठी झाले आहे. तो नेहमीच उत्कृष्ट कलाकार होता आणि आहे. मी जेव्हा त्याला पहिल्यांदा संहितेचे वाचन करायचे होते तेव्हा भेटले. त्याचे प्रश्न, सल्ले, संहितेची चिंता आणि त्याची या सिनेमातली व्यक्तिरेखा सारचं काही उत्तम आहे. मी सोनमला याआधी एक दोन वेळा भेटले आहे. ती खूप उत्साही आहे आणि सिनेमाच्या चित्रिकरणावेळी तिच्यासोबत चांगला वेळ घालवण्याचा माझा विचार आहे. मासिक पाळीबद्दल आजही खुलेपणाने बोलले जात नाही यावर बोलताना राधिका म्हणाली की, हीच योग्य वेळ आहे जेव्हा सर्वांनीच या गोष्टींबद्दल खुलेपणाने बोलले पाहिजे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920