anandnagri logo
मुख्य बातम्या:

नोटाबंदीची पन्नाशी

By आनंदनगरी वेब टीम | Tue 27-12-2016 | 11:56:01 am


8 नोंव्हेबरला रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केली आणि पुढील पन्नास दिवस जुन्या नोटांचे व्यवहार सुरू राहतील असे सांगितले. 8 नोंव्हेबर पासुन देशभरात चलन गोंधळ सुरू झाला. जो तो आपल्या परीने व्यवहार करू लागला. नोटबंदीचा फटका सर्वानाच बसला आहे. पण पंतप्रधानांनी केलेल्या मंथनातुन काही तरी चांगले निघेल या आशेने गेली 47 दिवस देशभरातील नागरिक पंतप्रधानाच्या या निर्णयामागे ठामपणे उभा आहे. अर्थात अनेकवेळा बदलणाऱ्या निर्णयामुळे लोकांची तारांबळ उडाली, चिडचिड ही झाली, घरातील कार्य ही थांबले. व्यवहार जेमतेमच होऊ लागला. व्यवसायांवर परिणाम झाला. उद्योग थंडावले अशा परिस्थितीत नोटबंदीचे 47 दिवस पूर्ण झाले आहे. अवघ्या 3 दिवसात पंतप्रधानांनी मागीतलेली मुदत संपणार आहे. 30 डिंसेबरला केंद्र सरकार किंवा रिझर्व बॅंक काय निर्णय घेणार याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यानच्या काळात चलनाची मुबलक उपलब्धी नसल्याने बॅंका समोरील रांगा संपता संपल्या नाही. देशभरात 3 लाख एटीएम आहेत. असा दावा केला गेला. परंतु यातील लाख भरच एटीएम लोकांच्या उपयोगात आल्या असतील. चलन कल्लोळांच्या परिस्थितीनी देशात एकीकडे रान उठलेले असतांना दुसरीकडे राजकीय टिका टिप्पणी जोऱ्यात सुरू होत्या त्या आजही आहे. निर्णयावर टिका करण्यापासुन पंतप्रधान नरेंद्र मोदी घोटाळेबाज असण्यापर्यत टोकाची टिका या दरम्यान झाली. अशातही सरकारने मात्र हा निर्णय परत घेणार नाही. यावर ठाम राहत गेले. गेल्या 30 - 40 वर्षामध्ये देशात चलन बदलण्याचा निर्णय झाला नव्हता. मोंदी पंतप्रधान झाल्यानंतर हा निर्णय होईल असे वाटले ही नव्हते. परंतु मोदी धाडसी आहे. त्यांनी हा निर्णय घेतला टिकाकांराची टिका सहन केली. आणि या निर्णयावर ते ठाम राहिले. भविष्यातील भारताची अर्थवाटचाल ही अंत्यत प्रभावशाली असेल असा त्यांचा दृढ विश्वास आहे. परंतु नोटबंदीने देशाचे मोठे नुकसान ही झाले आहे. या दरम्यानच्या काळात विदेश कपंन्यानी आपली गुंतवणूक वाढविली नाही. दुसरीकडे देशातंर्गत उद्योगाला संथ गती आल्याने अनेकांना रोजगारापासुन दुर व्हावे लागले.  देशाच्या विकास दरालाही याचा काही प्रमाणात फटका बसला आहे. असे असले तरीही नोटबंदीच्या निर्णयानंतर देशातील सामान्य नागरिकांना या निर्णयाचे अडचण होत असतानाही स्वागत केले. सामान्यांना दिलेली 50 दिवसांची मुदत दोन दिवसात संपेल त्यानंतर मात्र सामान्यांना सरकारकडुन मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी कशा पुर्ण करणार हे पाहावे लागेल.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920