anandnagri logo
मुख्य बातम्या:

सेन्सेक्स 439 अंकांनी कोसळला  रुपयातही घसरण

By आनंदनगरी वेब टीम | Thu 13-10-2016 | 10:58:00 pm

फोटो

सेन्सेक्स 439 अंकांनी कोसळला 
रुपयातही घसरण
मुंबई (वृत्तसंस्था)- आठवड्याच्या सुरूवातीला काहीसा वधारणाऱ्या सेन्सेक्समध्ये 439 अंकाची घसरण झाली. निफ्टीतही जवळपास 135 अंकाची घसरण झाली. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 27,643 अंकावर तर, निफ्टी 8,573 अंकावर स्थिरावला होता. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किंमतीत 41 पैशांची घसरण होवून रुपयाची किंमत 66.94 रुपये इतकी झाली.सोमवारी सेन्सेक्स 21.20 अंकांनी वधारला होता. दसरा आणि मोहरमच्या सुट्टीनंतर आज सकाळी शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये घसरण सुरू झाली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बॅंकेने व्याज दरवाढीचे संकेत दिले असल्यामुळे बाजारात घसरण झाली असल्याचे बोलले जात आहे. पाश्चिमात्य देशातील बाजारात असलेल्या अस्थिरतेचा परिणाम मुंबई शेअर बाजारावर झाला. तर, चीनच्या शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम आशियातील शेअर बाजारावर झाला. 
त्याशिवाय शुक्रवारी देशातील आयटी क्षेत्रातील कंपन्या दुसऱ्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर करणार आहेत. आयटी क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांच्या नफ्यात घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याचा परिणामही आज सेन्सेक्सवर झाल्याची चर्चा सुरू आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920