सोन्याच्या किंमतीत घसरण; 26970 प्रतितोळा
By आनंदनगरी वेब टीम | Sat 17-12-2016 | 12:28:43 pm
फोटो
मुंबई (वृत्तसंस्था)-सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी सोन्याच्या दराने गेल्या 10 महिन्यांतील सर्वाधिक निचांकी नोंदवली. सोन्याचा दर दिल्लीत प्रतितोळा 27,300 रुपयांवर पोहोचला. तर मुंबईत प्रतितोळा सोने 26,970 रुपये आहे. सोन्याबरोबरच चांदीची झळालीही ओसरली. चांदीच्या किंमतीतही घसरण नोंदवली गेली. चांदीचा दर प्रतिकिलो 40, 415 रुपये आहे. सोन्याच्या किंमतीवर नोटाबंदीमुळे परिणाम झाल्याचे सांगण्यात येते.
काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे सध्या बाजारात चलन तुटवड्याची समस्या आहे. चलन समस्येमुळे लोकांनी सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे सराफांकडूनही घाऊक बाजारातून सोने खरेदी केले जात नाही. त्यांनीही सोने खरेदी करण्यात आखडता हात घेतला आहे. सोने कमी प्रमाणात खरेदी करून सराफा दुकानांत ठेवले जात आहे. सोन्याचे दर घसरण्याबरोबरच चांदीच्या किंमतीवरही परिणाम झालेला दिसून येत आहे. चांदीचा भाव खाली आला आहे. चांदीचा दर किलोला 40, 415 रुपयांवर पोहचला आहे. नाणे बनवणाऱ्या कंपन्या आणि संबंधित औद्योगिक विभागांकडून चांदीची मागणी कमी झाल्याने किंमतीवर परिणाम झाल्याचे सांगण्यात येते. व्याजदरांत वाढ करण्याचे संकेत मिळाल्याने सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. तत्पूर्वी व्याजदरांत सध्या तरी कोणतीही वाढ होणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र, आता व्याजदरांत वाढ होणार असल्याचे संकेत मिळाल्याचा हा परिणाम आहे, असेही जाणकारांकडून सांगण्यात येते.
व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California