anandnagri logo
मुख्य बातम्या:

शेअर निर्देशांकात  95 अंकांची घसरण

By आनंदनगरी वेब टीम | Thu 15-12-2016 | 10:58:37 am


मुंबई (वृत्तसंस्था) - शेअर बाजाराचा निर्देशांक आज 94.98 अंकांनी घसरून 26,602.84 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही 39.35 अंकांनी वधारून 8,182.45 अंकांवर बंद झाला.मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांवर आधारित निर्देशांक सकाळच्या सत्रात 20.42 अंकांच्या घसरणीसह 26,674.40 अंकावर उघडला. दिवसभराच्या कामकाजात निर्देशांकाने 26,736.34 अंकांची उच्चांकी तर 26,547.05 अंकांची नीचांकी पातळी गाठली.राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांवर आधारित निर्देशांकही सकाळी 12.95 अंकांच्या घसरणीसह 8,208.85 अंकांवर उघडला. दिवसभराच्या कामकाजात निर्देशांकाने 8,229.40अंकांची उच्चांकी तर 8,165.10 अंकांची नीचांकी पातळी गाठली.टाटा मोटर्स, विप्रो, टाटा पॉवर, टीसीएस, इन्फोसीस आदी कंपन्यांच्या समभागांत वाढ झाली. मारूती सुझुकी, बजाज ऑटो, ल्युपिन,  भेल, कोटक बॅंक आदी कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण झाली.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920