anandnagri logo
मुख्य बातम्या:

पुढील वर्षी भारताचा विकास दर 7.6% राहण्याचा अंदाज -  संयुक्त राष्ट्र

By आनंदनगरी वेब टीम | Mon 05-12-2016 | 12:08:21 pm

फोटो


लंडन (वृत्तसंस्था)-संयुक्त राष्ट्र  पुढील वर्षात भारताचा विकास दर 7.6 टक्के राहण्याचा अंदाज संयुक्त राष्ट्राच्या अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. देशात पायाभूत विकास झाल्यामुळे उत्पादन क्षेत्राचा पाया मजबूत झाला आहे. यामुळे गुंतवणुकीत पुन्हा एकदा तेजी आली आहे. जगभरातील विकसित अर्थव्यवस्था गती वाढवण्यासाठी संघर्ष करत असताना भारत आणि चीन आशिया प्रशांत क्षेत्रासह जगभरासाठी भारत नेतृत्व करत असल्याचे मत या अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. या अहवालानुसार 2017 मध्ये चीनचा विकास दर किरकोळ घसरणीसह 6.4 टक्के राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर आशिया अँड पॅसिफिक (एसकेप) या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वर्षाच्या शेवटी जाहीर होणाऱ्या याच्या आशिया-प्रशांत क्षेत्र - 2016 आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण अहवालानुसार भारताची अर्थव्यवस्था वर्ष 2016-17 आणि 2017-18 दरम्यान 7.6 टक्क्यांच्या गतीने वाढण्याचा अंदाज आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920