anandnagri logo
मुख्य बातम्या:

धर्मनिरपेक्ष नेतृत्व-खा.अशोक चव्हाण

By आनंदनगरी वेब टीम | Thu 27-10-2016 | 08:37:55 pm

फोटो


अशोक चव्हाण यांचा जन्म शंकरराव व कुसुमताई चव्हाण यांच्या पुण्यकुशीत 28 ऑ्नटोबर 1958 रोजी मुंबई येथे झाला. मराठवाडा मुक्ती लढ्यातुन शंकरराव चव्हाण यांचा राजकारणात प्रवेश झाला. गोदावरी नदीकाठी वसलेल्या दक्षिण काशी पैठण येथील चव्हाण घराणे आहे. अशोक चव्हाणांनी आपले शिक्षण बी.एस्सी., एम.बी.ए. पर्यत घेतलेले आहे. तसेच इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांना आपल्या वडिलांकडुन राजकीय, संघर्षमय जीवन आणि विरोधकांचा वारसा मिळाला. महाराष्ट्रातील सुसंस्कृत, कर्तृत्ववान, द्रेष्टा व सकारात्मक दृष्टीकोनाचे राजकारण त्यांच्याकडे पहावयास मिळते. सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची परंपरा तसेच जातीपातीच्या पलीकडे धर्मनिरपेक्ष राजकारणाचे पुरस्कर्त्या पैकी ते एक आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीस त्यांची पत्नी अमिताताई चव्हाण यांची खंबीर साथ त्यांच्या पाठिशी पहावयास मिळते. विरोधकाचे काम असते टिका करण्याचे व माझे काम आहे जनतेची सेवा करण्याचे. या त्यांच्या एका वाक्यातुन राजकीय पार्श्वभूमी लक्षात येते. सत्ता ही जनतेच्या हितासाठी असते नव्हे की, स्वत:च्या व आप्तेष्टांच्या उपभोगासाठी, या तत्वानुसार राजकारण करणारे चव्हाण आहेत. 
सन 1984 मध्ये प्रदेश युवक कॉंग्रेसच्या माध्यमातुन अशोक चव्हाणांनी राजकारणाची सुरुवात केली. 1987 मध्ये नांदेड लोकसभेची निवडणुक जिंकून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या समवेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. 1992 मध्ये महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर ते निवडून आले. 1993 मध्ये स्वत:च्या कर्तृत्वाने महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळविले. सन 1999 मध्ये विधानसभेवर निवडून येऊन महाराष्ट्र राज्याचे क्रमांक 2 चे महसुल मंत्री पद त्यांचेकडे आले. 2008 पर्यत जवळपास सर्व खात्याचा कारभार योग्य रितीने हाताळला व जनतेच्या कल्याणाचे धोरणात्मक निर्णय घेतले. 26 नोव्हेंबर 2008 रोजी े मुंबईवर दहशतवादी हल्ला झाल्याने महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता दिसुन आली, यात तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांना दुर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रासाठी सक्षम नेतृत्व म्हणून अशोक चव्हाण यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. मुंबईसह देशावर दहशतीची छाया पसरलेली असतांना त्यांनी प्रशासनावर आपली पकड निर्माण करून मुंबईसह देशाला पूर्वपदावर आणले. जनतेच्या मनातील भयाचे वातावरण संपवून त्यांच्यात पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण केला व महाराष्ट्र सरकार सदैव जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत आहे, हे कार्यातुन दाखवुन दिले. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत होता अशावेळी त्यांनी मुख्यमंत्री या नात्याने कर्ज माफी देऊन लाखोंच्या पोशिंद्याचे ऋण फेडले. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन लागू करून जनतेच्या सेवेसाठी शासन गतिमान केले. 
अशोक चव्हाणांनी आपल्या आजोबांच्या नावे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना उभारून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा कारखाना उभारून दिला. नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण 5 सहकारी साखर कारखाने ते यशस्वी रित्या चालवित असुन या कारखान्याचे चेअरमन पद सामान्य शेतकरी कुंटुंबातील कर्तृत्ववान व्यक्तिस दिले, जे की, सहकारात सहसा आढळत नाही. शारदा भवन शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन हजारों विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडुन दिली त्यामुळे नांदेडचा आज विद्यार्थी परदेशापर्यंत मजल मारत आहे. 
सन 2009 च्या महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणूका कॉंग्रेस पक्षाने अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात लढल्या, अपेक्षेप्रमाणे राज्यामध्ये कॉंग्रेस क्रमांक 1 चा पक्ष म्हणून उदयास आला. स्वकर्तृत्वाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी दुसऱ्यांदा शपथ घेऊन देशामध्ये महाराष्ट्राला अग्रस्थानी आणले. 2014 च्या लोकसभेच्या निवडणूकीत नांदेड मधुन दणदणीत विजय संपादन करून दिल्लीत बदललेल्या परिस्थितीत आत्मविश्वासाने राज्याचे व देशाचे प्रश्न सभागृहाच्या माध्यमातुन यशस्वीरित्या सोडवतांना दिसतात. त्यांच्या कर्तृत्वामुळे व त्यांच्यांवर असलेल्या जनतेच्या विश्वासाच्या जोरावर महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी  कॉंग्रेस पक्षाने त्यांची निवड केली. जनतेच्या कल्याणासाठी लोकशाहीच्या तत्वानुसार सक्षम विरोधी पक्षाची भूमिका सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली कॉंगे्रेस पक्षामार्फत केली जात आहे. राज्यातील प्रत्येक निवडणूकांमध्ये जनतेच्या कल्याणासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यास अशोक चव्हाण सर्व ताकदनिशी बळ देतांना दिसुन येत आहे, ज्यामुळे पुढील काळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा कॉंग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता असेल हा आत्मविश्वास महाराष्ट्राच्या पुरोगामी जनतेस निर्माण होत आहे. पुरोगामी महाराष्ट्राची त्यांच्या हातुन सर्व समाजाची सर्व बाजुने प्रगती व्हावी, ह्याच त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.....!

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920