anandnagri logo
मुख्य बातम्या:

या दिवाळीत दूर करा मनातील अंधार

By आनंदनगरी वेब टीम | Thu 27-10-2016 | 08:36:39 pm

फोटो


दिवाळी हा आपल्या प्रत्येकाच्याच आवडीचा सण आहे. अबालवृद्ध वर्षभर या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. पहाटेचं सुंदर वातावरण, तेल उटण्याचं सुवास, फराळाया पदार्थांचा घराघरातून येणारा घमघमाट, नवे कपहे, फटाके, धामधूम आणि याच्या जोडीला प्रत्येकाचं मन आणि घर उजळवून टाकणारे आकाशकंदिल, पणत्या आणि दिवे. नुसत्या वर्णनाने मन प्रसन्न झाल्यासारखं वाटलं ना! मनात उत्साहाची ज्योत पेटली ना! हल्ली आनंदी व समाधानी माणसं दुर्मिळ होत चालली आहेत. कोणाशी जरा बोलायला जा, तक्रारींचा पाढा सुरू झालाच म्हणून समजा. माझ्याकडे वेळ नाही, पैसे नाहीत, या जीवघेण्या स्पर्धेत स्वत:साठी वेळच नाही. मुड नाही, कामाचं खुप लोड आहे वगैरे वगैरे. आपल्या कारणांची यादी संपतच नाही. खर तर आपण आनंद लांबणीवर टाकण्याच्या या साऱ्या सबबी आहेत. या सबबी देण्याच्या नादात आणि कामाचा अती ताण घेण्याच्या नादात आपण आपल्यातला आनंद, प्रेम, समाधान, हरवून बसलोय. मनात दाटून आलेला हा अंधार दूर करणारा आणि लांबणीवर पडलेला आनंद भरभरून लुटण्यासाठी प्रकाशाची लयलुट करत प्रत्येकाचं मन उजळवून टाकण्यासाठी एक नामी संधी चालून आली आहे. ती म्हणजे आपली आवडती, हवीहवीशी वाटणारी दिवाळी
हल्ली आनंदी व समाधानी माणसं दुर्मिळ होत चालली आहेत. कोणाशी जरा बोलायला जा, तक्रारींचा पाढा सुरू झालाच म्हणून समजा. माझ्याकडे वेळ नाही, पैसे नाहीत, या जीवघेण्या स्पर्धेत स्वत:साठी वेळच नाही. मुड नाही, कामाचं खुप लोड आहे वगैरे वगैरे. आपल्या कारणांची यादी संपतच नाही. खर तर आपण आनंद लांबणीवर टाकण्याच्या या साऱ्या सबबी आहेत. या सबबी देण्याच्या नादात आणि कामाचा अती ताण घेण्याच्या नादात आपण आपल्यातला आनंद, प्रेम, समाधान, हरवून बसलोय. प्रत्येक वयोगटातल्या प्रत्येकचं व्यक्तीला मनाला एक प्रकारची मरगळ आली आहे. प्रत्येकाच्याच मनाला काळजी, चिंता, स्पर्धा, विषण्णता, याची अंधारी झालर चढली आहे. जी आपल्या मनावर परिणाम करते आहे. आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडवंत आहे. प्रत्येकालाच सतत एक अस्वस्थ पातळीवर आणून उभे करत आहे.
पण मनात दाटून आलेला हा अंधार दूर करणारा आणि लांबणीवर पडलेला आनंद भरभरून लुटण्यासाठी प्रकाशाची लयलुट करत प्रत्येकाचं मन उजळवून टाकण्यासाठी एक नामी संधी चालून आली आहे. ती म्हणजे आपली आवडती, हवीहवीशी वाटणारी दिवाळी दिवाळी हा आपल्या प्रत्येकाच्याच आवडीचा सण आहे. अबालवृद्ध वर्षभर या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. पहाटेचं सुंदर वातावरण, तेल उटण्याचं सुवास, फराळाया पदार्थांचा घराघरातून येणारा घमघमाट, नवे कपहे, फटाके, धामधूम आणि याच्या जोडीला प्रत्येकाचं मन आणि घर उजळवून टाकणारे आकाशकंदिल, पणत्या आणि दिवे. नुसत्या वर्णनाने मन प्रसन्न झाल्यासारखं वाटलं ना! मनात उत्साहाची ज्योत पेटली ना!
खरं सांगायचं तर आपल्या आयुष्यातली दगदग, धावपळ, स्पर्धा, स्पर्धेत जिंकण्यासाठीचे प्रयत्न, या साऱ्याला सामोरे जाताना येणारा ताण, विषण्णता, यश अपयशाचे चढउतार,येणारे चांगले वाईट अनुभव यातली कोणतीच परिस्थिती 100% आपल्या नियंत्रणाखाली येऊ शकणारी नाही. फार कमी वेळा परिस्थिती आपल्याला अनुकुल असणारी मिळते. मग ज्या गोष्टींवर / परिस्थितींवर आपलं नियंत्रण नाही त्या परिस्थितीच्या सततच्या दबावाखाली, तणावाखाली आपण आपलं मानसिक आरोग्य का ढासळावयाचं? जे बदलण शक्य नाही त्यामागे धावण्यापेक्षा जे शक्य आहे त्याचा पुरेपुर उपभोग घेत आनंदी आयुष्य जगायला नको का?
दिवाळीत दाराबाहेर, खिडकीत लावलेली प्रत्येक छोटी छोटी पणती, लाईटच्या माळेतला उजळलेला प्रत्येक छोटासा दिवा, प्रत्येक जण प्रत्येकाची जबाबदारी उचलतो. त्यामुळेच तर दिवाळी प्रकाशने उजळून निघते ना! यात प्रत्येकाचा वाटा खारीचा असला तरी त्यापेक्षा जास्त मोलाचा असतो ना? अगदी तसचं तर आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक बरी वाईट परिस्थिती स्वीकारली आणि आपल्या छोट्या मोठ्या सकारात्मक विचारांची, प्रयत्नांची आपल्यातल्या क्षमतांची एकजुट केली तर आपलं मन उजळून निघणार नाही का? आपल्या प्रत्येक वर्तनामागे विचार आणि भावना यांचा मोठा वाटा असतो. किंबहुना विचार आरि भावनांमुळेच आपले वर्तन घडते. 
हे विचार जेवढे नकारात्मक, त्रासदायक, घातक तेवढं वर्तन समस्यात्मक, आयुष्य त्रासदायक पण हेच जेवढे सकारात्मक, स्व प्रेरणा वाढवणारे, उत्साह वाढवणारे आयुष्य आनंदी आणि सुखकारक.
आपल्या मनात येणरा प्रत्येक विचार आणि भावना म्हणजे दिवाळीत घरात लावलेल्या पणत्यांप्रमाणे आहे नव्हे पणतीचं आहे. ती तेवत ठेवण्यासाठी सकारात्मक विचाराचं तेल घालावं की नकारात्मक विचाराचं तेल हा मात्र सर्वस्वी तुमचा. आपला वैयक्तिक निर्णय आहे आणि तो घेण्याएवढे आपण नक्कीच सक्षम आहोत. 
नकारात्मकतेचे तेल घालतं गेलात तर वार्ता भोवती म्हणजेच आयुष्याभोवती काळजी धरून अंध:कार होईल आणि सकारात्मकतेचे तेल घातलत तर पणतीतील वात शांतपणे आणि चिरकाल काजळी न धरता तेवत राहील आणि दिवाळीत पणत्या, दिवे जर घर प्रकाशांनी उजळून टाकतात तसं तुमच आयुष्य सुख, समाधान, आनंद आणि यशांनी उजळून टाकेल. फक्त गरज आहे ती दिशा निवडण्याची. आपल्या आतला आनंदाचा झरा सदैव खळखळत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची मनातल्या विचार आणि भावनांच्या पणतीला सकारात्मक ब्रॅंडच तेल घालण्याची मग बघा आयुष्य कसं उजळून निघेल. आनंदाचा लक्ष प्रकाश नकारात्मकतेचा अंध:कार कसा धुवून काढेल आणि आयुष्यातला प्रत्येकचं दिवस दिवाळीप्रमाणे उजळेल.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920