anandnagri logo
मुख्य बातम्या:

नितीन लोहट ः एक क्रांतिकारी विचार

By आनंदनगरी वेब टीम | Fri 21-10-2016 | 08:15:43 pm

फोटो


शाळेत साधा शिक्षक असलेला एक माणूस आपल्या साधनेच्या बळावर इतका मोठा होऊ शकतो हे मा. नितीन सरांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्यातून त्यांच्या तळमळीतून सिद्ध होते.
मी कोण? कोठून आलो आणि काय करायचे आहे हे यक्ष प्रश्न 
मानवाला सतत भेडसावत असतात. जे अनेक काळापासून प्रस्थापित आहेत आणि पुढे राहतीलही या प्रश्नापैकी काय करायचे आहे हे अनेक विद्वतजनांनी त्यांच्या उज्वल कार्यातून सिद्ध केले आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात मा. नितीन लोहट सरांनी परभणी सारख्या छोट्या जिल्ह्यात याचा वस्तूपाठ आपणा सर्वांसाठी घालून दिला आहे, असे मला खात्रीपूर्वक वाटते. मा. नितीन सरांनी समान शिक्षणासाठी प्रत्येक कार्यक्रमात अत्यंत प्रभावी व हृदयाला भिडणारी मर्मस्पर्शी भाषणे केली. त्यांच्या भाषणातून त्यांची समाज शिक्षणाची तळमळ स्पष्ट होते. एखाद्या पित्याने आपल्या मुलीची काळजी व तिचे भविष्य कसे उज्ज्वल होईल याचा ध्यास घ्यावा तसाच ध्यास मा. नितीन लोहट सरांनी जिजाऊ ज्ञानतीर्थ 
माध्यमिक व कनिष्ठ 
महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलासाठी घेतला आहे. आज याच ध्यासातून जिजाऊ ज्ञानतीर्थ संस्थेतून शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. 
समाजातील असे एकही क्षेत्र नाही की, त्यात जिजाऊचा विद्यार्थी नाही. क्रांती डोंबे (जिल्हाधिकारी), जयश्री मुलगीर (पीएसआय), सुजाता गायकवाड (ऍग्री ऑफिसर), गणेश गाडे (इंजि. युएई), डॉ. निलेश दळवे (एचबीएचएमएस), रवि गायकवाड (बीएचएमएस), विजय चोपडे (इंजि. अफ्रिका), शिवाजी कामूटाल (एमबीबीएस 2016), शशी पालवे (एमबीबीएस 2016) अशा हजारो विद्यार्थ्यांना घडविण्याचे महान काम मा. नितीन लोहट सरांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र सुरू आहे. सन 2016 चा जर विचार केला तर परभणी जिल्ह्यातील सर्व क्रीडा पारितोषिके हे जिजाऊ ज्ञानतिर्थ शाळेला आहेत. गणपती महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत ऑलिम्पिक पटू ललिता बाबरच्या हस्ते या शाळेच्या गणेश निरस, संभाजी धनवडे, अश्विनी काळे या विद्यार्थ्यांचा सन्मान केला गेला. हा क्षण खरोखरच सरांच्या कार्याला प्रोत्साहन देणारा आहे. आधुनिक काळात महाराष्ट्रात सामाजिक प्रबोधनाच्या आंदोलनाच्या चळवळीच्या अनेक संघटना आहेत. 
महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक महान विभूती विसाव्या शतकात कार्यरत आहेत. स्थिती प्रवणता आणि साचलेपणा विरूद्ध नव्या जाणिवा पेरण्याचे कार्य मा. नितीन सरांच्या हातून घडत आहे. प्रस्थापित विचार व्यवस्थेविरूद्ध उभे राहून नवी प्रबोधनात्मक विचारधारा रूजवने अवघड असतेे. अनेक आव्हाने टिकवावी लागतात. सत्य निर्भयपणे आणि प्रखरपणे सांगावीच लागते. जननिंदा आणि उपहास याची पर्वा न करता समाज परिवर्तनाच्या त्यांचा चिरंतर ध्यास खरोखरच अतुलनीय आहे. पारंपरिक शिक्षणापेक्षा आधुनिक शिक्षण त्यांना अपरिहार्य वाटत होते. शिक्षक हा सारथी असताना प्राध्यापक परिश्रम, संशोधन आणि चिंतन करणारा असावा. उत्तम शिक्षक नुसता विद्वान असून चालत नाही तर तो सर्वश्रूत शुद्ध वाणी असायला हवी. तसेच तो विद्यार्थ्यांत उत्साह वाढवणारा निर्माण करणारा असावा, असे मा. नितीन सरांना शिक्षकाच्या बाबतीत सातत्याने वाटते. स्वाभिमान, स्वविश्वास हरवून बसलेल्या लोकांना समाजात ताठ मानेने जगण्याचे सामर्थ्य बहाल करण्यासाठी माणुसकीला पारखा झालेल्या समाजाला माणूस म्हणून जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मा. नितीन सरांच्या सुपिक संकल्पनेतून संकल्प मनाचा अाधार शिक्षणाच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या जबाबदारी स्वीकारली आहे. यात आज 30 मुले-मुली शिक्षण घेत आहेत. अशा अनाथ मुलींना 
मायेचा हात देण्याचे काम मा. नितीन सरांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ ज्ञानतीर्थ संस्थेत यशस्वीरित्या सुरू आहे. जीवनातले खूप चढ-उतार, सुख-दुःख पचवून हा माणूस मनातली रसरसीत नाविन्यता घेऊन उभा आहे. आम्हा सर्व जिजाऊच्या धडपडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांचा पाठीवरून फिरवणारा हात म्हणजे हजार हत्तीचे बळ देणारा जादूचा स्पर्शच असतो. अशा या ज्ञानराजाला 
समाज उन्नतीसाठी उदंड आयुष्य लाभो हिच इश्वरचरणी प्रार्थना. 
- प्रा. उत्तरेश्वर माणिक शिंदे जिजाऊ ज्ञानतिर्थ कनिष्ठ महाविद्यालय, परभणी. 9823526555.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920