anandnagri logo
मुख्य बातम्या:

वर्तन ""माणसातला माणूस जागवण्याची वेळ...''

By आनंदनगरी वेब टीम | Mon 17-10-2016 | 08:59:15 pm


एकविसाव्या शतकावरून मागे जाऊन
मानवाच्या उत्पतीचा काळ शोधताना
आपणास अनेक शतके मागे जावे लागते.
रानावनात कंदमुळे खाऊन जगणाऱ्या आधी
मानवा पासून खऱ्याअर्थाने मानवाचा काळ
पुढे सरकत गेला. तद्‌नंतर तो इतका सरकत
गेला की, तो हळूहळू भौतिक संस्कृतीच्या
दिशेने अधिकचा पुढे येत गेला. इतका की,
तो आकाशातुन उंच उडू लागला. समुद्रातुन
फिरू लागला. तसेच सृष्टीतल्या सात
खंडातुन मुक्तपणे विहार करू लागला. पण
एका बाजूला माणूस मात्र आपल्यातील
माणूसकिचा कप्पा रिकामा करून जगू
लागला. भौतिक संस्कृतीच्या मागे धावताना
अभौतिक संस्कृतिचा वारसा विसरून गेला.
त्यात नितीमत्ता गमावुन बसला. म्हणुन इथे
संस्कृतीचा गावचं वेगळा झाला. आई -
वडील गेल्यावर मालमत्तेचा वारसदार म्हणून
शिक्का मोर्तब करण्यात आनंद सारा. आई -
वडिलांशी सेवा करण्याच्या वेळेला हा
कोणत्या शहरात कोणत्या मजल्यात रहात
होता हे कसलेच आई - वडिलांना माहित
नसावे. म्हणजे या देशातील महान भारतीय
संस्कृती जिचा जगाला हेवा वाटतो. तो देवा
आज वाटण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होत
चालल्याची खंत इथे कोणालाच वाटत नाही.
याकडे फार गांर्भियाने पहाण्याची आज गरज
वाटते.
"श्यामची आई' मधील "थोर अश्रू' या
संस्कार कथेतुन श्याम पायाच्या तळण्यांना
घाण लागू नये म्हणुन जसा जपतो तसा
मनाला घाण लागू देऊ नकोस. असी त्याची
भारतीय संस्कृतीतली आई सांगते. हा
मानवाच्या स्वच्छतेचा संदेश आजच्या
काळात कुठे बसवावा हाच प्रश्न उरतो.
कारण अनेक प्रांत, अनेक भाषा, अनेक
धर्म, अनेक जाती, अनेक चालीरिती अनेक
वेशभुषा, केशभूषा या सर्वानी बनलेला व
आधुनिक स्वातंत्र्य, समता बंधुत्व या गुणाने
संपन्न असलेला किंवा अलिकडे जास्तीचा
संपन्न असलेला किंवा आलिकडे जास्तीचा
संपन्न झालेल्या आपल्या भारत देशाकडे लक्ष
केंद्रीत केल्यास आज भारताचे चित्र विकोपाला
येऊन पोहचल्याचे आपणास दिसुन येते.
कारण आज राजकारण, धर्मकारण व
समाजकारण हे सर्वकाही जास्तीत जास्त
स्वार्थापोटी चालल्याचे दिसून येते.
आज आपण जर निसर्गाकडे एक
दृष्टिक्षेप टाकल्यास निसर्ग आपणास किती
प्रकारची नैसर्गिक साधन सामुग्री अगदी
मोफत पुरवतो. त्याच्या मोबदल्यात आपण
त्याची परतफेड तर करतच नाही. पण
त्यातही तर पर्यावरणाचा समतोल
ठेवण्यासाठी आज महाराष्ट्र सरकार अनेक
झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. त्यात
आपण किती प्रामाणिक
पणे झाडे लावतोत. हे
एखादे झाड लावून, फोटो
घेऊन प्रसिद्धिला देणारे
लोकच ठरवतील. म्हणुन
या समाजात सारे काही
फोटोसाठी असे वाईट
कृत्ये चालल्याचे लक्षात
येते. प्रत्येकाला वाटते
आपण कसलीच
मेहनत न करता सर्वत्र
आपलेच नाव
आपलाच फोटो
लागावा ही नियती
फारच घातक आहे. कारण नम्र माणूस "खरे
ते माझे' म्हणत असतो पण आज त्याच्या
उलट "माझे ते खरे' म्हणण्यातच आजचा
माणूस व्यस्त झाला आहे.
मोबाईलमुळे संदेशनाची सोय झाली
आहे. हे मान्य आहे, तर दुसरीकडे मात्र
लुचाडासाठी ते एक खोट बोलण्याचे
महत्वाचे साधन होवुन बसले आहे. कारण
त्याचा वापर योग्य व उपयुक्त कामे करून
आपला विकास वेगवान करण्यासाठी
करून घेतला पाहिजे. पण आजचे
विशेषत: तरूण त्याचा उपयोग किती योग्य
कामासाठी करतात हे विचार न केलेलाच
बरा.
विनोबा भावे आपल्या एका निबंधात
सांगतात एवढा मोठा सुर्य तुम्हा, आम्हा
सारख्या सामान्य माणसासाठी आपली
सेवा करण्यासाठी आपल्या दारावर येऊन
तिष्ठत थांबलेला असतो. तुम्ही सकाळी
उठुन अर्धेदार काढलात तर अर्धाच प्रकाश
आत येत असतो. जर आपण पूर्ण दार
काढला व जर पुर्ण प्रकाश घरात येत
असतो. म्हणुन आपल्या आज्ञेनुसार
(ज्याचं जगावर राज्य आहे) असा तो सुर्य
आपली सेवा करण्यास तयार असतो.
याच्या मोबदल्यात आपण काय देतो हे
स्वत:ला विचारण्याची आता वेळ आलेली
आहे.
या उलट आपण
सुर्याच्याच प्रकाशात
वाढणारी व आपणास सावली
व प्राणदायी देणारी झाडे
तोडुन जंगले साफ करतात.
आजच्या काळात माणसाची
मानसिकता लक्षात
घेण्यासाठी आपण एक
उदाहरण घेऊ. एके
दिवशी एका गावात
सार्वजनिक कार्यक्रम
असतो. त्यासाठी
प्रत्येकांनी एक शेर दुध
आणून समाज मंदिरावर ठेवलेल्या कढई मध्ये
टाका असे सर्व गावकऱ्यांना सांगण्यात येते.
तेव्हा प्रत्येक माणसांने असा विचार केला
की, सर्वतर दुध टाकत आहेत. त्यात आपण
जर एक शेर दूधा ऐवजी एक शेर पाणी टाकले
तर काय बिघडेल. सर्व दुधात आपले पाणी
मिसळत जाईल शेवटी कढईत जमले काय ?
तर निव्वळ पाणी म्हणुन आज माणसं प्रथम
आपण माणूस आहोत, हे मात्र विसरून
स्वार्थाला कुरवाळत आहेत. हे जर
समाजातुन घालवायचे असेल तर प्रत्येकांची
आपल्यातला माणूस जागवण्याची वेळ
आली आहे. तुरतास इतकेच.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920