anandnagri logo
मुख्य बातम्या:

उत्तम आरोग्याची सुत्रे...

By आनंदनगरी वेब टीम | Sat 15-10-2016 | 11:33:33 am

फोटो

उत्तम आरोग्य लाभावे असे प्रत्येकाला वाटत असते. तंदरूस्त राहण्यासाठी अनेक सुत्रे आहेत. परंतु, आपल्या आरोग्याला ज्याचा फायदा होत असेल त्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. त्याचा अवलंब केला पाहिजे. कोणताही संकल्प करण्यापूर्वी तो आपल्याकडून पूर्ण होणार की नाही, याबाबत विचार केला पाहिजे. अन्यथा तो संकल्पही पूर्ण होत नाही आणि अमुल्य वेळही वाया जात असतो. 
रोज आपण 10 किलोमीटर चालण्याचा संकल्प केला. परंतु, संकल्प करण्यापूर्वी कोणत्याच प्रकारचा विचार केलेला नसतो. त्यामुळे 10 किमीचे अंतर पाहूनच निश्चयाला सुरूंग लागतो. या उलट जर दररोज 1 किमी चालण्याचा संकल्प केला तर 100 टक्के तो पूर्ण करण्यात आपल्याला यश येईल व त्याचा अनुकुल फायदाही आपल्या आरोग्याला होईल.
उत्तम आरोग्यासाठी आपण अनेक संकल्प करत असतो. परंतु सातत्य न राखल्याने त्याचा पाहिजे तसा प्रभाव पडत नाही. म्हणून पेलवेल असाच संकल्प केला पाहिजे. 
संकल्पासाठी कोणताही दिवस चालू शकतो. त्यासाठी एक तारखेची वाट पाहण्याची गरज नाही. त्यामुळे हे संकल्प अगदी आजपासूनही सुरू करू शकता. 
* अधिक पाणी प्यावे-  आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाणी हे आपल्या शरीराचे प्रमुख तत्व असून वजनाच्या 60 टक्के अंश पाणी असते. शरीराच्या प्रत्येक अवयवाला पाणी आवश्यक असते. दिवसभरात किमान 1.5 लीटर पाणी आपल्या शरीराला आवश्यक असते. 
* आहारातील मीठ कमी करा-लोणचे, पापड, चटणी, दही, केन्ड सूप यांचे कमी प्रमाणात सेवन करा. कारण त्यात इतर पदार्थांच्या तुलनेत अधिक मीठ असते. रोजच्या आहारातही मीठ कमीच असावे. मीठाचे अतिसेवनामुळे शरीराची हाडे ठिसूळ होतात. दिवसभरात 5 ग्रॅमपेक्षा अधिक मीठ आपल्या शरीरावर विपरीत परीणाम करते. 
* हिरव्या पालेभाज्या व फळे खावीत. 
* वजन कमी करा- अतिरिक्त वाढलेले वजन धोकादायक ठरू शकते. यातूनच हृदयरोग व मधुमेह यासारखे आजार होण्याची शक्यता असते. लठ्‌ठपणा टाळण्यासाठी आधीपासून संतुलित आहाराचे सेवन केले पाहिजे. दिवसभरातून एकदा आपले वजन करून पहावे. वजन वाढल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर डॉक्टराचा सल्ला घ्यावा.
* रक्तदाब व कोलेस्ट्रॉलची तपासणी- उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीला मुतखडा व हृदयविकाराचा झटका येण्याची भीती अधिक असते. त्यामुळे नियमितपणे रक्तदाबाची तपासणी केली पाहिजे.
* व्यायाम करावा- व्यायाम केल्याने शरीरात स्फूर्ती जागृत होते. हृदयासोबत शरीरातील मांसपेशी मजबूत होत असतात. व्यायाम सवय लावल्याने शरीर विकसित होत असते. पोहणे किंवा सायकल चालवणे आदी गोष्टी व्यायाम म्हणून आपण करू शकता. 
* धूम्रपान करू नये- धूम्रपान केल्याने रक्तदाब वाढतो. व्यायाम करण्याची क्षमता घटते व कर्करोगासारख्या महाभयानक आजाराला तोंड द्यावे लागत असते.
उत्तम आरोग्यासाठी 6 सुत्रे ..
 आपले आरोग्य उत्तम असावे असे प्रत्येकाला वाटत असते. आयुर्वेदिक व्यवसाय करताना, आरोग्य उत्त्म ठेवण्यासाठी लक्षात आलेल्या काही नियम आपणासमोर देत आहे. आपल्या आरोग्याला त्याचा निश्चितच फायदा होईल त्यामूळे त्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे व त्याचा अवलंब केला पाहिजे. 
1 बाहेरचे खाणे टाळावे- बाहेरील कोणत्याही प्रकारचे तयार अन्न खाण्याचे टाळावेत. आपण घरी 150 रू किलोचे तेल खातो पण बाहेर 50 किलोच्या तेलामध्ये अन्न पदार्थ तयार केलेले असतात. साफ स्वच्छता नसते, प्रत्येक अन्न पदार्थात खाण्याचा सोडा, प्रिझेर्वेटिव्ह यांचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला असतो. आहारातील मीठ कमी करा- लोणचे, पापड, चटणी, दही, यांचे कमी प्रमाणात सेवन करा. कारण त्यात इतर पदार्थांच्या तुलनेत अधिक मीठ असते. रोजच्या आहारातही मीठ कमीच असावे. मीठाचे अतिसेवनामुळे शरीराची हाडे ठिसूळ होतात. दिवसभरात 5 ग्रॅमपेक्षा अधिक मीठ आपल्या शरीरावर विपरीत परीणाम करते. हिरव्या पालेभाज्या व फळे खावीत. आयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे थोडिसी भुक शिल्ल्‌क ठेउनच आहार सेवन करावे.
वेळेवर जेवण करावे, रात्री 7 च्या आत जेवण करण्याचा प्रयत्न करावा.मांसाहार टाळावा. 
2. पाणी अधिक प्यावे- पाणी हेच आपले जीवन आहे, आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. पाणी हे आपल्या शरीराचे प्रमुख तत्व असून आपल्या वजनाच्या 60 टक्के अंश पाणी शरीरात असते. दिवसभरात किमान 1.5 लीटर पाणी आपल्या शरीराला आवश्यक असते. शरिरात पाण्याचे प्रमाण योग्य असेल तर, पोट व्यवस्थित साफ होते, लघवीच्या तक्रारी राहत नाहित, अन्न पचन व्यवस्थित होते. त्वचेचे आजार होत नाहित. 
3.वजन नियंत्रणात ठेवा - शरीराचे अतिरिक्त वाढलेले वजन धोकादायक ठरू शकते. यातूनच हृदयरोग व मधुमेह यासारखे आजार होण्याची शक्यता असते. लठ्‌ठपणा टाळण्यासाठी आधीपासून संतुलित आहाराचे सेवन केले पाहिजे. नियमित व्यायाम, योगासने केली पाहिजे .महिण्यातुन एकदा आपले वजन करून पहावे. वजन वाढल्याचे निदर्शनास आल्यास वजन कमी करण्याचा प्रयत्न करावा. 
4.रक्तदाब व कोलेस्ट्रॉल, रक्त शर्करेची नियमित तपासणी- उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीला मुतखडा व हृदयविकाराचा झटका येण्याची भीती अधिक असते. त्यामुळे नियमितपणे रक्तदाबाची तपासणी केली पाहिजे. रक्तातील शर्करा, कोलेस्ट्रॉल, हिमोग्लोबिन यांची नियमित तपासण्या कराव्यात.
5.नियमित व्यायाम करावा- व्यायाम केल्याने शरीरात स्फूर्ती जागृत होते. हृदयासोबत शरीरातील मांसपेशी मजबूत होत असतात. सुस्ती किंवा आळ्स कमी होतो, उत्साह वाढतो, झोप चांगली येते.
व्यायाम सवय लावल्याने शरीर विकसित होत असते. पोहणे किंवा सायकल चालवणे, फिरायला जाणे आदी गोष्टी व्यायाम म्हणून आपण करू शकता. ज्यांना व्यायाम शाळेत जाणे शक्य नसेल त्यांनी नियमित 5 ते 6 किलोमिटर दररोज चालण्याचा प्रयत्न करावा. 
6.व्यसन करू नये-
तंबाखु, सुपारी, गुटखा धूम्रपान यासारख्या पदार्थाचे व्यसन शरीरास जडल्यास रक्तवाहीन्यांचे काठिण्य एउन रक्तदाब वाढतो. व्यायाम करण्याची क्षमता घटते व कर्करोगासारख्या महाभयानक आजाराला तोंड द्यावे लागत असते.
डॉ. पवन एस. लड्डा
 

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920