anandnagri logo
मुख्य बातम्या:

शेतकऱ्यांनी जोडधंद्यातून विकास साधवा - हंसराज अहिर

By आनंदनगरी वेब टीम | Sun 16-10-2016 | 11:52:24 pm


यवतमाळ,(वृत्तसंस्था)-शेतीमधून शोशत उत्पन्नाची
शक्यता कमी झाली आहे. पूर्वी ज्याप्रमाणे प्रत्येक घरी
दुधाळ जनावरे असायची आणि त्यातून घरखर्च
चालायचा तो काळ परत शेतकऱ्यांच्या घरी आणण्याची
वेळ आली आहे. त्यामुळे आत्महत्या केलेल्या
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून
जोडधंद्यातून विकास साधावा, असे आवाहन केंद्रीय
गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. ते मारेगाव येथे
आयोजित गायी आणि शेळी वाटप कार्यक"मात बोलत
होते.
राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर्सच्या सामाजिक
उत्तरदायीत्व निधीतून बळीराजा चेतना अभियानातून
शेतकरी आत्महत्या केलेल्या विधवांच्या कुटुंबियांना
दुधाळ जनावरे आणि शेळीचे वाटप आज करण्यात
आले. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, राजू
तोडसाम, अशोक उईके, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप
सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह,
ऍड. विनोद तिवारी, मारेगाव नगर पालिकेचे उपाध्यक्ष
प्रशांत नांदे, उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा
आदी उपस्थित होते.
श्री. अहिर म्हणाले, शेतकरी आत्महत्या केलेल्या
कुटुंबियांना मदत करण्यासाठी हा कार्यक"म घेण्यात
आला आहे. गरीब कुटुंबांना स्वत:च्या पायावर उभे
राहता यावे, यासाठी ही मदत करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी मोठ्या कंपन्यांना
त्यांच्या दोन टक्के योगदानातून शेतकरी कुटुंबांना पुन्हा
पायावर उभे राहण्यासाठी मदत करण्यात येत आहे.
पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 332 शेतकरी कुटुंबियांना
मदत करण्यात येत आहे. मारेगाव येथील 31 गायी
आणि 18 शेळींचे वाटप लकी ड्रॉ काढून करण्यात येत
आहे. उर्वरीत कुटुंबियांना डिसेंबरपर्यंत मदत करण्यात
येणार आहे.शेतकऱ्यांना मदतीसोबतच दिलेल्या गायींचे
स्वास्थ टिकविण्यासाठी पशू विभागाची मदत दिली
जाणार आहे. त्यासोबतच सिंचनाची सुविधा आणि
उत्पादीत मालाचे मार्केटींसाठी मदत केली जाणार आहे.
या एकत्रित परिणामाुंळे शेतकरी कुटुंबाची आर्थिक
स्थिती सुधारण्यावर सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे.
येत्या काळात शेतकऱ्यांना मदत करून भाजीपाला आणि
दुध उत्पादनावर भर देण्यात येऊन त्यांना मदत करण्यात
येणार आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी मुद्रा योजनेतून
शेतमालावर प्रकि"या करण्यासाठी आणि शेतीवर
आधारित उद्योगासाठी कर्ज देण्यात येणार आहे.
त्यासाठी नुकतीच सुधारणा करण्यात आली आहे. तसेच
जंगलातील चारा गावातील जनावरांना मिळावा, यासाठी
प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. बोदकुरवार यांनी शेतकऱ्यांचे जीवनमान
उंचावण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या
रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याची माहिती
दिली. श्री. तोडसाम यांनी कुटुंबाचे पालनपोषण
करण्यासाठी ही मदत होणार आहे. शासनाच्या
सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे शेतकरी आत्महत्यांध्ये निश्र्चितच
घट होणार असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी दुधाळ जनावराुंळे
शेतकरी कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. शासनाने
ही मदत केली आहे. ही मदत यशस्वी करून
दाखविण्याची जबाबदारी कुटुंबावर आहे. आत्मनिर्भर
होण्यासाठी ही मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना
मदत होण्यासाठी पशू विभागाने पर्यवेक्षन करावे, तसेच
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रकिया उद्योगाला
सहाय करण्यात येणार आहे.

 

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920