anandnagri logo
मुख्य बातम्या:

मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान

By आनंदनगरी वेब टीम | Thu 29-09-2016 | 06:35:46 pm

उमरी (प्रतिनिधी) - मागील तीन वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरीवर्ग दु:खावला होता. पण या चालू वर्षी निसर्गाच्या कृपेने उमरी तालुक्यातील वेळेनुसार पेरणी झाली. त्यात मध्यंतरी अंदाजे चाळीस दिवस प्रर्जन्यवृष्टी झाली नाही.  त्यामुळे अगोदरच हलक्या जमिनीतील सोयाबीन, उडीद, कापूस हे वाया गेले आहे. त्यात या महिन्यात दहा दिवस संततधार पाऊस झाल्यामुळे शेतातील उभे असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यासाठी संंबंधीत वरिष्ठांनी त्वरीत दखल शेतातील उभ्या पिकांचे पंचनामा करून शेतकऱ्यांस आर्थिक मदत करावी अशी मागणी जि.प. सदस्य तथा रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष मारोतराव कवळे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंदराव सिंधीकर व अन्यकर्त्यांनी केली आहे.उमरी तालुका व परिसरात मागील दहा दिवसांपासून संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे असलेले सोयाबीन, उडीद या महत्वाच्या असलेल्या पिकांना मोड फुटून वाया गेले आहे. त्यामुळे शेतकरी राजाला तोंडाला आलेले पिके वाया गेले. त्यासाठी वरिष्ठांनी या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करून त्यास शासनाच्या वतीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मारोतराव कवळे, गोविंदराव िंसधीकर, युवानेते शिरीष देशमुख गोरठेकर, पांडूरंग देशमुख, सुभाषराव गोरठेकर, गणेश गाढे, प्रभू पाटील पुयड, कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष लिंगराम पाटील कवळे आदी शिष्टमंडळाने तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आर.एच. पंगे यांना एका लेखी निवेदनाद्वारे देण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार कैलास चंद्रवाघमारे आदी कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920