दोन दिवसात मान्सून सक्रिय होणार
By आनंदनगरी वेब टीम | Wed 15-06-2016 | 10:41:56 pm
फोटो
मराठवाड्यात जलनियोजनाचा अभाव
कृषि हवामान शास्त्रज्ञ प्रा. प्रल्हाद जायभाये यांचे मत
मुकुंद पाठक
जालना : भारताच्या दक्षिणी समूह किनाऱ्यांवर कमी दाबाच्या हवेचे पट्टे निर्माण झाले नाही म्हणूनच मान्सून लांबणीवर पडला. आता मात्र परिस्थिती बदलत आहे. मान्सूनसाठी आवश्यक हवेचे पट्टे भारताच्या समुद्र किनाऱ्यांवर तयार होत असून येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जेष्ठ कृषी हवामान शास्त्रज्ञ प्रा. प्रल्हाद जायभाये यांनी दैनिक आनंद नगरीशी बोलताना दिली.
प्रल्हाद जायभाये हे वसंतराव नाईक कृषी विद्यापिठ परभणी येथे ग्रामिण कृषी मोसम सेवा विभागात मुख्य प्रकल्प समन्वयक म्हणुन कार्यरत आहेत. मान्सून लांबनीवर पडण्याची कारणे मराठवाडयातील जलनियोजनाचा अभाव, मराठवाडयातील दुष्काळी परिस्थीतीला कारणीभूत असलेली कारणे आदी विषयांवर प्रा. जायभाये यांनी आपली मते मांडली.
मान्सून प्रवास : जूनच्या पहिल्या आठवडयात अरबी समुद्र व पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यांवर हवेच्या कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. त्याचवेळी मान्सथूनवारे अंदमान निकोबार पर्यंत असतात. कमीदाबांच्या पट्ट्यांमुळे मान्सुनवारे भुपृष्ठांकडे ओढले जातात. जस जसे वारे पुढे जातात तस तसा मान्सुनचा प्रवास भुपृष्ठाकडे वाढत जातो. या प्रवासात हवेचा दाब कमी होतो. तसे बाष्पाचे प्रमाण वाढते आणि केरळ पासून ते सातपुडयाच्या हिमालय उपरांगांमधे हे वारे अडले जाते आणि पाऊस पडतो. मात्र आता मान्सुन लांबणीचे कारण स्पष्ट करताना प्रा. जायभाये यांनी अरबी व पश्चिम बंगालच्या समुद्र किनारी भागात कमीदाबाच्या हवेचे पट्टे निर्माण झाले नाहीत. केरळ गुजरातच्या समुद्र किनाऱ्यांवरही हीच परिस्थिती होती. त्यामुळेच मान्सून लांबणीवर पडला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मान्सुनवारे जोपर्यंत भूमीकडे येत नाही तो पर्यंत पाऊस पडत नाही. मात्र हेच मान्सून वारे समुद्र किनाऱ्यांवर सक्रिय झाले असुन त्यामुळेच येत्या दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रातही सक्रिय होईल अशी शक्यता प्रा. जायभाये यांनी व्यक्त केली. यंदा पाऊस चांगला पडेल असे हवामान खात्याने सांगितले आहे. कृषी हवामानाच्या दृष्टीनेही यंदा चांगला पाऊस पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचबरोबर जुन्या पिढीतील लोकांकडून पावसाच्या प्रगतीचे काही ठोकताळे वर्तवले जातात. ज्यात पक्षी आपले घरटे कसे बांधतो, पळसाच्या झाडांना लागणाऱ्या फुलांवरू नही जुने लोक पावसाचा अंदाज बांधत होते यंदा हे अंदाजही उजवे आहेत. त्यामुळेच आपण यंदा पाऊस चांगला पडेल. असे समजल्यास काहीच हरकत नाही. असेही त्यांनी म्हटले.
मराठवाडयातील दुष्काळ
केरळच्या समुद्र किनाऱ्यांवर यावेळी वादळे वाढली. त्याचाही मान्सुनच्या प्रवासाला अडथळा निर्माण झाला असे सांगुन प्रा. जायभाये यांनी मराठवाडयात गेली 3/4 वर्षे पाऊस नसण्याची कारणे स्पष्ट केली. अरबी समुद्राच्या 900 मिटर वरती कमी दाबाच्या हवेचे पट्टे निर्माण होणे आवश्यक असतात वादळी वाऱ्यामुंळे अनुकूल असलेली परिस्थिती बदलली आणि हिंद महासागराकडून विषववृत्त ओलांडून जेे वारे येतात त्यामुळे देशाच्या दोन्ही बाजुला दोन पट्टे निर्माण होतात. त्यातील पश्चिम बंगाल बिहार आणि पुढे जातात तर दुसरा पट्टा अरबी समुद्राकडुन केरळ, कर्नाटक, आंध्र व पुढे असा प्रवास करतात मात्र नेमकी हीच परिस्थीती दोन तीन वर्षापासुन निर्माण झाली नाही
त्यामुळे महाराष्ट्र विशेषकरून मराठवाडयात पाऊस पडला नाही असे मत त्यांनी मांडले.
तरीही शेतीला फायदा होणार नाही
यंदा पाऊस चांगला पडेल परंतु त्याचा फायदा शेतीला होणार नाही असे स्पष्ट मत प्रा. जायभाये यांनी मांडले. मराठवाडयात जोपर्यंत जलनियोजन होत नाही तोपर्यंत हीच परिस्थिती राहील असे सांगुन त्यांनी शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करताना पाणी बचतीचे उपाय करणे आवश्यक आहे. आपल्याकडे पाऊस जास्त पडला म्हणजे ऊस किंवा इतर फळबागा लावणे चुकीचे होईल असे सांगून जायभाये यांनी दरवर्षी 700 ते 800 मि मी पाऊस सातत्याने पडला आणि हे पाणी अडवल गेल्यास ऊस आणि फळ बागांचे नियोजन आपल्याकडे होऊ शकते अन्यथा पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणेच मराठवाडयासाठी फलदायी असल्याचे ते म्हणाले.
अजूनही वेळ गेली नाही
पाऊस लांबला असला तरीही अजून फार उशीर झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. आपल्याकडे 9 ते 13 जूनदरम्यान पाऊस सुरू होतो त्यामानाने केवळ दोन तीन दिवसच उशीर झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी कडधान्य, तेल बिया, बाजरी, खरिप ज्वारी, सोयाबीन, तुर, कापुस, हे सर्व पिके शेतकऱ्यांना घेता येतील, मात्र दरम्यानच्या काळात पाऊस आलाच नाही तर तूर सोडुन डाळवर्गीय पिके शेतकऱ्यांनी वगळावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
दुष्काळाचा सामना यशस्वीपणे करा
महाराष्ट्रात 80 टक्के कोरडवाहू शेती होते. हाच आकडा मराठवाडयासाठी 82 टक्क्यांवर जातो. यामुळेच आपला भाग दुष्काळी आहे. हा दुष्काळ आपण हटवू शकत नाही. मात्र या दुष्काळाचा सामना आपण यशस्वीपणे करू शकतो. या साठी जल नियोजन सर्वोत्तम पर्याय असल्याचे प्रा. जायभाये यांनी सांगितले. राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना आखुन दुष्काळाला घालवण्यासाठी शाश्वत पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तर वृक्षलागवड हादेखील उत्तम पर्याय असल्याचे ते म्हणाले.
व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California