anandnagri logo
मुख्य बातम्या:

सोयाबीनचे दर कोसळले; शेतकरी हवालदिल

By आनंदनगरी वेब टीम | Sun 06-11-2016 | 08:03:26 pm


सोलापूर (वृत्तसंस्था) - शेतक-यांचे नगदी पीक म्हणून उदयास येत असलेल्या सोयाबीनचा दर कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खरिपाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून शेतक-यांदचे नगदी पीक म्हणून उदयास येत असलेल्या सोयाबीन पिकाच्या काढणीचा सुध्दा खर्च निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
नांगरट, कोळपणी, पेरणी, खुरपणी, फवारणी इत्यादीचा खर्च सुध्दा निघत नाही. सुरूवातीला 2900 रूपये असणारा दर 1600 रूपयांवर आला आहे. सलग लागून राहिलेल्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, तूर यांसारख्या पिकांची वाताहत झाली आहे. शासनाने हमीभाव जाहीर केले असले तरी व्यापार्यांयकडून मात्र शासनाच्या हमीभावाला केराची टोपली दाखवली जात आहे. त्यामुळे सलग चार वर्षांपासून शेतक-यांच्या हाताला काहीच लागत नाही. सोयाबीन भिजल्यामुळे व काळे पडल्याचे सांगून सोयाबीन व्यापारी वाटेल त्या दराने खरेदी करून घेत आहेत. त्यामुळे पांगरी परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

Ad #9

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920